सोशल मिडीयावर येणार बंदी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |

 

 

नवी दिल्ली : राष्ट्रीय व नागरी सुरक्षेचा प्रश्न उद्भवल्यास तणावसदृश परिस्थिती निवळेपर्यंत विविध लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सवर बंदी घालण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. यामध्ये फेसबुक, व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इन्स्टाग्राम यांचा समावेश होऊ शकण्याची चिन्हं आहेत. या संदर्भात केंद्र सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडे शिफारसींची मागणी केली आहे.

 

सामाजिक वातावरण अस्थिर असताना अफवांचे पीक येते. या अफवा फेसबुक, व्हॉट्सॲप इत्यादी माध्यमांतून वेगाने पसरतात. याचे अनेकदा हिंसाचारात रूपांतर होताना पाहायला मिळते. अशा अफवांना आणि त्यांमुळे उद्भवणाऱ्या घटनांना आटोक्यात आणण्यासाठी केंद्र शासन हे पाऊल उचलण्याच्या विचारात आहे.

 

आयटी कायद्यातील कलम ६९A नुसार केंद्र शासनाकडे समाज माध्यमांवर निर्बंध आणण्याचा अधिकार आहे. या कलमाच्या अनुषंगाने माहिती व तंत्रज्ञान विभागाने विविध टेलिकॉम ऑपरेटर्सना, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाला व भारती इंटरनेट सेवा प्राधिकरणाला त्यांचे मत जाणून घेण्याकरिता पत्र पाठवले आहे.

@@AUTHORINFO_V1@@