औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी विद्यापीठात शिबिर संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |
 

 
 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने पुण्यातील उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने औषधी वनस्पती लागवड आणि प्रक्रिया याविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिला बचत गटांसाठी व्यापारी तत्त्वावर औषधी वनस्पतींची लागवड करून हाती आलेल्या उत्पादनांवर प्रक्रिया करून अधिक नफा कशाप्रकारे मिळू शकेल यावर मार्गदर्शन करण्यात आले.
 
या शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. नूतन मालपाठक यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी सुरेश उमप, प्रकल्प अधिकारी मिलिंद लोंढे उपस्थित होते. या शिबिरात उपस्थित महिलांना औषधी वनस्पती ओळख, औषधी वनस्पतींची रोपवाटिका करण्याची पद्धत तसेच त्यांचे उपयोग आणि संवर्धन करण्याच्या पद्धती याविषयी प्रशिक्षण वर्गदेखील घेण्यात आला. या वेळी शासकीय योजना आणि लघुद्योग उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सहयोगी प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट यांनी घेतले.
 
यावेळी पुढील वनस्पती प्रत्यक्ष माहिती व ओळख करून त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
⦁ औषधी पिके - शतावरी, अश्वगंधी, ब्राम्ही, सर्पगंधा, कोरफड, सोनामुखी, पिंपळी, कळलावी, इसाबगोल, सफेदमुखी, इत्यादी
⦁ सुगंधी वनस्पती - वाळा, नागरमोथा, सिट्रोनेला, पुदिना, गवती चहा, अनंतमुळ इत्यादी
 
देशी वनस्पतींसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असणाऱ्या काही वनस्पतींची माहिती यावेळी करून देण्यात आली. या सह पिक काढण्याचे तंत्र व त्यासाठी आवश्यक कौशल्य, काढणीपश्चात करावयाची प्रक्रिया अशा तांत्रिक माहितीवर आधारित प्रात्यक्षिकेदेखील दाखवण्यात आली. तसेच या प्रशिक्षणाचा वापर करून कोणकोणत्या क्षेत्रात काम करणे शक्य आहे ती माहिती देण्यात आली. प्रशिक्षक म्हणून डॉ. मंदार अक्कलकोटकर, डॉ. सचिन आरू, डॉ. संजय वानखेडे, गिरीश गांधी आणि पराग लिमये यांनी काम पाहिले.
@@AUTHORINFO_V1@@