भरलेल्या खड्ड्यांची दर आठवड्याला होणार पाहणी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |



ठाणे : शहरातील जे खड्डे भरण्यात आले आहेत, त्या खड्ड्यांची दर आठवड्याला नियमित पाहणी करण्याबरोबरच ते खराब झाले असतील तर ते परत भरण्याची कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बांधकाम विभागाला दिले. या संदर्भात आज महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्या ची बैठक घेऊन खड्ड्यांच्या बाबतीत प्राधान्याने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

 

शहरातील रस्त्यांची चाळण झाली असताना, आयुक्तांनी स्वत: रस्त्यावर उतरून या रस्त्यांची पाहणी केली होती. रस्त्यांची दुरुस्ती तसेच खड्डे भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापरही पालिकेकडून करण्यात आला मात्र, भरलेल्या खड्ड्यांची पाहणी अधिकाऱ्या कडून होत नाही, हे लक्षात येताच आयुक्तांनी दर आठवड्याला खड्ड्यांची पाहणी करण्याचे आदेश अधिकाऱ्या ना दिले. यावेळी जयस्वाल यांच्यासह उपनगर अभियंता, कार्यकारी अभियंता बैठकीस उपस्थित होते. गणपतीच्या आधी तरी प्रशासनाकडून सर्व खड्डे बुजवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@