अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हत्येप्रकरणी निषेध मोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |

फैजपूरला विविध समाजाचे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन

 
फैजपूर, ता. यावल :
मुलूर जिल्हा कोलार, कर्नाटक येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्येप्रकरणी फैजपूर येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास सोमवारी सकाळी अभिवादन करून निषेध मोर्चा काढण्यात आला.
 
 
तत्पूर्वी मोर्चा सुभाष चौक, बसस्थानक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनिल चौधरी, माजी उपनगराध्यक्ष बापूभाऊ कपडे, माजी नगरसेवक मनोज कापडे, रघुनाथ कुंभार, माजी नगरसेवक अप्पा चौधरी, रिपाइं अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष ईश्वर इंगळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष अनवर खाटीक, पिंटू मंडवाले, बंटी मंडवाले आदी उपस्थित होते. निवेदन डॉ. थोरबोले यांनी स्वीकारत आपल्या समाज भावना निवेदनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचतो असे आश्वासित केले. यावेळी अल्पवयीन मुलीवर झालेल्या हत्येच्या निषेधार्थ शोकसभेद्वारे तिला श्रद्धांजली देऊन मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
 
 
राष्ट्रवादीचे अशोक भालेराव, भाजपचे संजय सराफ, रिपाइं शहराध्यक्ष अमर मेढे, गिरीश कापडे, रवींद्र कापडे, गोकूळ कुंभार, अतुल कापडे, इंजि. सागर कापडे, विनोद मंडवाले, राजू कापडे, अंकुश इंगळे, यासह अत्याचाराचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठ सर्व समाजातील तरुण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@