महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या पर्यटनाबाबत खा.ए.टी.नाना पाटील यांनी संसदेत उठवला आवाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |
 
 
नवी दिल्ली :
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला भक्कम असे गड-किल्ले दिले. या गड-किल्ल्यांच्या पर्यटनातून महाराष्ट्रात मोठया प्रमाणात महसूल येऊ शकतो त्यासाठी केंद्र शासनाने योजना आखण्याची गरज सोमवारी जळगावचे खासदार ए.टी.नाना पाटील यांनी लोकसभेत व्यक्त केली.
 
 
लोकसभेत तारांकित प्रश्नात खा.पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वराज्याच्या रक्षणासाठी मजबूत गड किल्ले बांधले. हा खूप मोठा ऐतिहासिक वास्तुंचा ठेवा असल्याने याठिकाणी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील व पर्यायाने राज्याच्या तिजोरीत मोठा महसूल जमा होईल. याकरिता केंद्र शासनाने काही योजना आखावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना केंद्रीय पर्यटन मंत्री एल्फान्स यांनी यासंदर्भात सकारात्मक पावले उचलण्यात येतील असे आश्वासन दिले. खा.पाटील यांनी केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शन व प्रसाद योजनांमुळे पर्यटन क्षेत्रातात होत असलेल्या विकासाबाबतही समाधान व्यक्त केले.
@@AUTHORINFO_V1@@