२०१९ मध्ये एकपक्षीय सरकार येण्याचा बाजाराला विश्वास!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |

अविश्वास ठराव फेटाळला जाणे हा एक टर्निंग पॉईंट, बाजारासाठी सकारात्मक
२००८ ची तेजी २००३ पासूनच, एलटीसीजी कर रद्दमुळे बाजाराला उत्तेजन

 
 
बाजार व धोका यांचे अतूट नाते, रिस्क पत्करल्याशिवाय ‘छप्पर फाडके’ कमाई नाही
सोशल मीडिया हब प्लॅनवर सरकारचे ‘घुमजाव’
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधातील अविश्वास ठराव फेटाळला जाणे ही एक वळण देणारी (टर्निंग पॉईंट) सकारात्मक घटना असून २०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकपक्षीय बहुमताचे सरकार सत्तेवर येण्याचा विश्वास शेअर बाजाराला वाटत आहे. तसेच व्यापार युद्धा(ट्रेड वॉर)ची भीतीही सध्या फारशी उरलेली नाही. युरोपियन संघटन व अमेरिका यांनी तडजोडीतून मार्ग काढण्याचे ठरविले आहे. असे असूनही जर व्यापार युद्ध झालेच तर मात्र जागतिक व्यापारात मंदीचा शिरकाव होण्याची शक्यता राहील.
भारतावरही या व्यापार युद्धाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पण तो पाहिजे तितका प्रभावी राहण्याची शक्यता नसणार. कारण भारताच्या सकल देशांतर्गत उत्पन्ना(जीडीपी)चा अगदी थोडा म्हणजे १४ टक्के भागच निर्यातीवर अवलंबून आहे. याची आणखी चांगली बाजू म्हणजे या जागतिक मंदीत कच्च्या खनिज तेला(क्रूड)च्या किंमती पडू शकतील. त्यामुळे आपली तुलनात्मक कामगिरी काहीशी बरी राहणार आहे.
 
 
काही जण २००८ मधील मंदीचा हवाला देत तिच्या बाजारा वरील परिणामाची शक्यता व्यक्तही करतील. पण २००८ च्या जानेवारीतील राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांका(निफ्टी) त्याने गाठलेल्या ६३५७ बिंदूंच्या शिखरावरुन गडगडत २२०० बिंदूंपर्यंत खाली गेला होता.
 
 
वस्तुत: २००८ पर्यंतची तेजी ही मार्च २००३ पासून सुरु झाली होती. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारातील अर्थमंत्री जसवंत सिंग यांनी चाकोरीबाह्य अर्थसंकल्प सादर करीत शेअर बाजारातील दीर्घ कालीन कमाईवरील कर (एलटीसीजी) रद्द केला होता. त्यानंतर जवळजवळ पाच वर्षांपर्यंत बाजारात तेजीच राहिली होती. त्यामुळे निफ्टीतही तब्बल सात पटींनी वाढ होत गेली होती.
 
 
निवडणुकांच्या बाबतीत म्हटले तर ती फारशी महत्वाची बाब म्हणता येणारी नाही. मे २००४ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेतून जाऊन कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील मनमोहन सिंग यांचे सरकार आल्यानंतर दोनेक दिवसच बाजार १७ टक्क्यांनी कोसळला होता. पण नंतर तीन महिन्यांच्या आतच बाजाराने झालेले नुकसान भरुन काढीत वर्षभरात ५० टक्के परतावा दिला होता.
 
 
तसे पाहिले तर बाजार आणि धोका (रिस्क) यांचे अतूट नाते राहिलेले आहे. धोका पत्करल्याशिवाय कुणालाही कमाई मिळू शकत नाही. जर तुम्ही धोका पत्करण्याची तयारी दर्शविली नाही तर तुम्हाला नंतर मिळू शकणार्‍या ‘छप्पर फाडके’ कमाईवर ‘पाणी सोडण्या’ची तयारीही करावी लागते. एका हिंदी गाण्यात म्हटल्यानुसार ‘ये इश्क इश्क है’ यात थोडा बदल करुन ‘ये रिस्क रिस्क है’ असे म्हणता येईल. याचा अर्थ बाजारात कुठल्याही क्षणी रिस्क ही असतेच. तिला डावलून बाजारात कुठलीही यशस्वी कार्यवाही करता येणारच नाही. विशेषत: फ्युचर्स ऍण्ड ऑप्शन्समध्ये तर याची खूपच तयारी ठेवावी लागत असते.
 
 
उदाहरणार्थ गेल्याच जुलै महिन्यात निफ्टीचा ११ हजार बिंदूंचा कॉल अवघ्या ४ ते ५ रुपयांच्या प्रिमियरवरच उपलब्ध झालेला होता. त्याआधी २ जुलैच्या अंकातील याच स्तंभात दाखवून दिल्यानुसार प्रत्येक वर्षाचा जुलै महिना निफ्टीसाठी लाभदायक असल्याचे दिसून आले आहे. त्याप्रमाणे खरोखरच निफ्टीने जुलैत सुमारे सहाशे बिंदूंची उसळी घेतली होती. ११ हजार बिंदूंचा कॉलही दीडशेच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला होता. तो देखील फ्युचर्स ऍण्ड ऑप्शन्सच्या एक्सपायरीच्या दिवशीच! म्हणजेच जर कुणी ११ हजारचा एक कॉल घेतला असेल त्यांना दलाली व करवजा जाता ५० हजार रुपयांपेक्षाही जास्त कमाई झाली असती! ११ हजार बिंदूंच्या कॉलचे एकापेक्षा जास्त जितके लॉट घेतले असते तितक्या पटीने जास्त कमाई होऊ शकली असती.... पण ‘जर-तर’ला काहीही ‘अर्थ’ नसतो हे अर्थव्यवहारच्या वाचकांनी तरी ध्यानात घेण्याची गरज आहे!
 
 
आता या वर्षातील रिस्न्स कोणत्या ते पाहू या. तज्ञांच्या म्हणण्यानुसार आगामी काळात क्रूडच्या वाढणार्‍या किंमती, विदेशी चलनबाजारातील भारतीय रुपयाची सतत घसरती किंमत, वाढती वित्तीय तूट, रिझर्व बँकेचे वाढीव व्याज दर, राजकीय व व्यापारी क्षेत्रातील घडामोडी या मोठ्या रिस्क असतील. अशा परिस्थितीत खाजगी बँका, विमा, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या, एफएमसीजी व फार्मा ही क्षेत्रे म्हणजे गुंतवणुकदारांसाठी ‘आशेचा किरण’ ठरणारी आहेत.
 
 
आज सोमवारी शेअर बाजार पुन्हा एकदा नव्या उंचीवर जाऊन पोहोचला. निफ्टीने आज सकाळी ११ हजार ४०० बिंदूंची मानसशास्त्रीय पातळी पार करीत ११ हजार ४०१ बिंदूंवर उघडीत ११ हजार ११ हजार ४२७ बिंदूंच्या सार्वकालिक विक्रमी उंचीवर जाऊन ११ हजार ४०० बिंदूंच्या खाली आला होता. दिवसअखेरीस तो २६ बिंदूंनी वाढून ११ हजार ३८७ बिंदूंवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स)देखील ३७ हजार ७१७ बिंदूंवर उघडत ३७ हजार ८०५ बिंदूंच्या ऑल टाईम हायवर जाऊन ३७ हजार ८०० बिंदूंच्या खाली आला होता. दिवसअखेरीस तो १३५ बिंदूंनी वाढून ३७ हजार ७९१ बिंदूंवर बंद
झाला.
 
मेहूल चोकसीला भारतात आणण्याच्या हालचाली वेगात
पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी प्रमुख आरोपी नीरव शहा याचा मामा मेहूल चोकसी याला भारतात आणण्यासाठीच्या हालचालींनी आता वेग घेतलेला आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारने अँटिगुआ सरकारकडे अर्ज दिलेला आहे. दरम्यान मेहूलला पोलीस व्हेरिफिकेशन क्लिअरन्स सर्टिफिकेट जारी करण्यात आल्याची चौकशी मुंबई पोलीसांकडून केली जात आहे. तसेच एखाद्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हेगारी खटला दाखल करण्यात आला आहे किंवा नाही याची तपासणी करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याची आवश्यकताही मुंबई पोलिसांनी व्यक्त केली आहे. याचे कारण म्हणजे अँटिगुआ सरकारने पोलीस क्लिअरन्स सटिफिकेट मिळाल्यानंतरच मेहुलला नागरिकत्व बहाल केल्याचे म्हटले आहे. अँटिगुआच्या सिटीझनशिप बाय इन्व्हेस्टमेंटने नागरिकत्वासाठीचा मेहुलचा अर्ज आपल्याला मे २०१७ मध्येच मिळाल्याचे उघड केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@