अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत चार जवान शहीद!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |


 

 

 

जम्मू-काश्मिर : उत्तर काश्मीरमधील गुरेज परिसरात झालेल्या चकमकीत जवान शहीद झाले आहेत. तर याच चकमकीत दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. गुरेझ येथील लाइन ऑफ कंट्रोल जवळ पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी भारतीय जवानांनी हटकल्यानंतर दहशदवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांनी चार दहशदवाद्यांना यमसदनी धाडले. मात्र या चकमकीत भारतीय लष्करातील एका मेजर सह जवान शहीद झाले आहेत.

 

मेजर के पी राणे, हवालदार जेमी सिंह, हवालदार विक्रमजीत आणि रायफलमन मनदिप अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा भारतीय लष्कराने ही कारवाई केली. कारवाई अद्याप सुरु असून यातील काही दहशदवादी पाकव्याप्त काश्मिरमध्ये पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमधील बांदीपुरासह आसपासच्या परिसरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@