वन कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्लावाहन अभावी रुग्णालयात पोहचण्यास विलंब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |
 
 
 वन कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला
वाहन अभावी रुग्णालयात पोहचण्यास विलंब
 
यावल , ७ ऑगस्ट 
तालुक्यातील पश्चिम भागात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वाघझिरा जवळील वनविभागाच्या तपासणी नाक्यावर तपासणीकरिता नियुक्त असलेल्या 2 वन मजुरांवर एकाने दगडाने हल्ला केला.  त्यात एक जण जबर जखमी झाला आहे ही घटना मंगळवारी सकाळी घडली . जखमीस तब्बल पाच तासानंतर यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे सागवान तस्करी च्या पार्श्वभूमीवर वनकर्मचाऱ्या वर होणारे हल्ले धोक्याची घंटा आहे.
यावल  तालुक्‍याच्या पश्‍चिम भागामध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी वाघझिरा गाव आहे तेथे सातपुड्यातून येणाऱ्या विविध रस्त्याच्या तपासणीसाठी नाका उभारण्यात आला आहे या नाक्यावरती राजू शंकर निकम व बाळू राजाराम पाटील हे दोन वनमजूर तपासणीसाठी नियुक्त करण्यात होते मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते  तपासणी करीत असताना वाघझिरा गावातील रहिवासी चंद्रकांत पावरा हा सातपुड्याच्या वनातून वाघझिरा गावाकडे परत येत होता तेव्हा दोन्ही वनमजुरांनी त्यास वनात का गेला होता अशी विचारणा केली तेव्हा त्याचा राग येऊन त्यांनी दोघं मुजरा वर हल्ला चढवला . त्याच्या हल्ल्यापासून बचाव करत असताना दोघ वनमजुरांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने दगड उचलून दगडाने दोघांवर हल्ला चढवला त्यात राजू निकम यांच्या डोक्याला  जबर दुखापत झाली तर पाटील यांना पाठीवर हातावर पायावर दगडाने मुका मार लागला , दोघांनी आरडाओरड केल्याने काही नागरीक जमा झाल्याने पावरा याने तेथून पळ काढला . घटना घडल्यापासून तब्बल चार तासापर्यंत रक्तबंबाळ अवस्थेत वाहन अभावी वनमजूर जंगलाच्या कोपऱ्यावरच पडून होते तर सायंकाळी साडेपाच वाजता त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती गंभीर असून वन मजुरांवर अशा प्रकारे होणाऱ्या हल्ल्यांमुळे घबराट पसरली आहे
पावरा यांनी यापूर्वी देखील वनमजूर अशाप्रकारे हल्ले केलेले आहेत मात्र रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या पाठीशी वन विभागाचे अधिकारी देखील धजावत नाही परिणामी अशा प्रकारे सागवान तस्करी करणाऱ्या ला रान मोकळे झालेला आहे वनअधिकारी देखील अशांवर कारवाई करता मागेपुढे बघत असल्याने हे प्रकार वाढत असल्याचे बोलले जात आहे
 
@@AUTHORINFO_V1@@