कुणाला कळाव्या, मनाच्या व्यथा या..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018   
Total Views |


 


कायम हसतमुख राहत आपल्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ताच लागू देणाऱ्या जयंतरावांच्या मनात सध्या नेमकं काय चाललंय, याचा एकदा शोध घ्यायला हवा. सांगलीतीलसदाशिव पेठीवाटावेत, इतकं तिरकस बोलून समोरच्याचा अंत पाहायचा, शक्यतो त्याचा संयम ढळू द्यायचा आणि मग शांतपणे मजा घेत बसायचं, ही जयंत पाटील यांची खास स्टाईल. त्यामुळेसौ चुहे खाके..’ म्हणीप्रमाणे आपण त्यातले नव्हेच, हे त्यांना बरोब्बर जमतं. यावेळेस मात्र, असं करणं त्यांना कितपत जमेल, हा प्रश्न आहे. त्याचं कारणच तसं आहे. जयंतरावांच्यालाडक्याभारतीय जनता पक्षाने जयंतरावांच्या कर्मभूमीत अक्षरशः शून्यातून झेप घेत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसला चारी मुंड्या चीत केलं आहे. नुकतंच कुठे जयंत पाटील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर जाऊन बसले होते. थोरल्या साहेबांनी अजितदादांच्या लाडक्या सुनील तटकरेंना त्या पदावरून हटवत (आपल्या लाडक्या?) जयंतरावांना तिथे नेमलं. आता बिचाऱ्या साध्याभोळ्या जयंतरावांचा हा आनंद टिकू द्यावा, असं बहुधा भाजपला वाटलं नसावं. म्हणूनच दोन-तीन महिने अथकपणे मेहनत घेऊन, संघटनशक्ती वगैरे उभी करत भाजपने ही निवडणूक स्पष्ट बहुमताने जिंकली. निवडणूक तोंडावर आलेली असताना एकीकडे भाजप कार्यकर्ते गल्लीबोळात पक्षवाढीसाठी राबणं, मोदी-फडणवीस सरकारच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविणं, अशी किरकोळ कामं करत बसले होते. दुसरीकडे कूटनीतीतज्ज्ञ जयंत पाटील आपल्या राष्ट्रवादीचा सहयोगी पक्ष असलेल्या काँग्रेसचं खच्चीकरण करण्याच्या महत्कार्याला लागले होते. म्हणूनच म्हणे जिथे भाजप उमेदवार तगडा आहे, तिथे काँग्रेस उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली. तसंही मदन पाटील, पतंगराव कदम आदी दिग्गज नसताना प्रथमच काँग्रेस महापालिकेच्या निवडणुकीला सामोरी गेली. पण काहीही झालं तरी, सांगली हा तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. केवढी ती मोठमोठाली आर्थिक साम्राज्ये. सहकारी संस्थांचं जाळं. शिवाय जातीचा आधार आहेच. कुणाची हिम्मत होती या मंडळींच्या, विशेषतः जयंतरावांच्या केसाला तरी धक्का लावण्याची? पक्षसंघटन वाढून, कार्यकर्ते जोडून काय कधी निवडणुका जिंकता येतात काय? पण माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक, हेच सगळं करून भाजपने निवडणूक जिंकून दाखवली. गेले दोन-तीन दिवस वाळव्यात भलतीच शांतता आहे. त्यामुळेच आता जयंतरावांच्या मनात काय चाललंय, हे कुणीतरी जाणून घेण्याची गरज आहे.

 
 

आनंदवनभुवनी !

 
 
 
 

वाळव्यात शांतता असली तरी तिकडे दूरवर कोकणातल्या रोह्यात (आणि गुपचूप बारामतीतदेखील!) जोरदार सेलिब्रेशन झालं, अशी आमच्या सूत्रांकडून खात्रीलायक माहिती समजते आणि का होणार नाही म्हणा. काय ती जोडी होती पंधरा वर्षं. एक अजितदादा आणि दुसरे तटकरेसाहेब. सगळं इतकं छान सुरू होतं पण त्या धरणांनी दोघांना पार वनवासातच पाठवून दिलं. २०१४ उजाडलं आणि त्यानंतर एकामागोमाग एक विपरीतच घडू लागलं. अजितदादांकडे नाही म्हणायला थोडं साम्राज्य तरी होतं. तटकरेंकडे तेवढंही नव्हतं. एक रायगड जिल्हा जेमतेम सात विधानसभा मतदारसंघांचा पण त्यातही शेकाप, शिवसेनेशी जुळवून घ्यावं लागायचं. हे कमी होतं की काय म्हणून २०१४ नंतर भाजपदेखील यात आला. लोकसभेला सेनेच्या अनंत गीतेंकडून जेमतेम दोन हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. स्थानिक राजकारणात भाऊ, पुतण्या, मुलगा अशा सगळ्यांच्या सोयी लावून दिल्या, तरीही पुन्हा काका-पुतण्यांच्या, भावा-भावांच्या वादाने नवी कटकट मागे लागली. इतके सगळे व्याप असूनही राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद मिळालं. या पदामुळे आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी परिस्थिती झाली. कारण समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकामागोमाग एक निवडणूक जिंकायचा सपाटाच लावला होता. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा-पंचायत समित्या, इतकंच काय, ग्रामपंचायतीसुद्धा एकेक करून हातच्या गेल्या. विधान परिषदेत तर पक्षाचे आमदार भाजपला मतदान करू लागले. अहो, अजितदादांचं पिंपरी-चिंचवड गेलं तिथे बाकीच्यांचं काय घेऊन बसलात. हे सगळं होत असताना प्रदेशाध्यक्षपद रोज नव्या कटकटी उभ्या करत होतं. अखेरतिसरा डोळाफिरला आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून थेट राष्ट्रीय सरचिटणीस टाईप पद मिळालं. आता राष्ट्रवादीसारख्या राष्ट्रीय पक्षात शरच्चंद्र पवारसाहेब यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सरचिटणीसपद मिळणं, हा केवढा मोठा सन्मान! हे कमी की काय, म्हणून तटकरेंचं पद काढून दिलं ते जयंतरावांना. ‘फ्रेंड्स ऑफ जयंत पाटीलनावाच्या फेसबुक अकाऊंटवर जयंतरावांचा फोटो लावूनएकच दादाअसं शीर्षक दिलं जातं आणि मुख्यमंत्री फडणवीस भर विधानसभेत अजितदादांना याचा दाखला देत विचारतात की, राष्ट्रवादीचे खरे दादा कोण.. आणि काकांनीही याच जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष केलं. हे कसं बरं चालणार. त्यामुळेच, सध्या वाळवा जरी वाळून गेला असला तरी बारामती-रोह्याला चांगलाचतजेलाआला आहे, ही आमच्या खबऱ्याची माहिती खरी मानायला हरकत नसावी.

@@AUTHORINFO_V1@@