यंदाच्या मान्सूनमध्ये अतिवृष्टीमुळे ७०९ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |
 

 
 
 
नवी दिल्ली : मुसळधार पाऊस, पूर आणि वादळ यांमुळे यंदाच्या मान्सूनमध्ये देशात आतापर्यंत ७०९ जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल लोकसभेत दिली. ही आकडेवारी ६ ऑगस्ट २०१८ पर्यंतची असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
यामध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक १६६ जणांना आपला जीव अतिवृष्टी व पुरामुळे गमावावा लागला असून त्या खालोखाल पश्चिम बंगालमध्ये १५८, केरळमध्ये १४२ तर महाराष्ट्रात १३९ जणांनी आपला जीव गमावला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद केंद्राच्या हवाल्याने हे आकडे देण्यात आले आहेत. यानुसार गुजरातमध्ये ५२ नागरिक, आसाममध्ये ४४ तर नागालँडमध्ये ८ नागरिकांचा मृत्यू पावसामुळे झाला आहे.
 
 
 
आतापर्यंत महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला आहे तर पश्चिम बंगालमधील २३, केरळमधील १४, उत्तप्रदेश आणि नागालँडमधील प्रत्येकी ११ तर गुजरातमधील १० जणांना पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसला आहे. आसाममधील तब्बल साडे अकरा लाख लोक या अतिवृष्टीमुळे प्रभावित झाले आहेत तर साडे सत्तावीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
 
 
देशाच्या विविध भागांत झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या विविध तुकड्यांच्या माध्यमातून मदत आणि बचावकार्य सुरु असल्याचे सिंह यांनी लोकसभेत सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@