राज्यातील १७ लाख कर्मचारी आज संपावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |




मुंबई : सातव्या वेतन आयोगाची अमलबजावणी आणि इतर मागण्यासाठी आज संपूर्ण राज्यातून १७ लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. सरकारने दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे मंत्रालयासह राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.


मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी या संपाला मोठ्या प्रमाणात पाठींबा दिला आहे. मंत्रालयापासून ते जिल्हा आणि तहसील कार्यालयांपर्यंत या संपाचा परिणाम पाहायला मिळत आहे. सरसकट सर्व कमर्चारी संपावर गेल्यामुळे सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तसेच अनेक ठिकाणची कामे देखील ठप्प पडली आहेत. त्यामुळे आपल्या कामांसाठी सरकारी कार्यालयात चकरा मारत असणाऱ्या सामान्य नागरिकांना आज देखील कार्यालयातून परत जावे लागत आहे.


दरम्यान या संपाविषयी सरकारने या अगोदरच सर्व कर्मचाऱ्यांना काही सूचना दिल्या होत्या. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ नुसार कर्मचाऱ्यांचा हा संप पूर्णपणे बेकायदा असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे संपात सहभागी झाल्यावर सर्व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, तसेच 'काम नाही, पगार नाही' या धोरणाचा अवलंब करत कर्मचाऱ्यांना पगार देखील दिला जाणार नाही, असे देखील सरकारने स्पष्ट केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@