मराठा आरक्षणासाठी अमित शाह, फडणवीस बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018
Total Views |


 

 

मुंबई : राज्यात निघणा-या मराठा आंदोलनाची दखल दिल्लीतही घेण्यात आली असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांनी दिल्लीत तातडीची बैठक बोलावली आहे. या बेैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील भाजपचे मराठा खासदार उपस्थित राहणार असून आज संध्याकाळी ७ वाजता हि बैठक होण्याची शक्यता आहे.


मराठा क्रांती मोर्चा हा दिल्लीत दाखल झाला असून जंतरमंतरवर अनेक मराठा संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. मराठा संघटनांकडून राज्यात निघत असलेल्या ठोक मोर्चाची दिल्लीने दखल घेतली असून, याच पार्श्वभूमीवर ही तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. अनेक मान्यवरांसह या बैठकीत राज्य प्रभारी सरोज पांडेदेखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, यावेळी मराठा आरक्षणासोबत धनगर आणि मुस्लिम आरक्षणाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@