'मराठा आंदोलन' या मुद्यावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आंदोलनासंबंधी सुमारे दीड तास चर्चा करण्यात आली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची दिल्ली येथे भेट घेतली. मराठा आंदोलनाचा मुद्दा आता आणखी गंभीर झाला असून याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली असल्याचे म्हटले जात आहे.
 
 
 
 
नुकतीच ही चर्चा संपली असून मराठा आरक्षणासंबंधी निर्णय घेण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मराठा आंदोलन आता केवळ महाराष्ट्रापर्यंत सीमित न राहता दिल्ली पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही भेट घेतली.
 
याशिवाय आज मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्रातील मराठा खासदार उपस्थित होते. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासंबंधी प्रश्न चिघळला असून आंदोलनाने हिंसक वळण घेतले आणि अनेक तरुणांनी आत्महत्या देखील केल्या. मात्र यासंबंधी कायमस्वरुपी आणि कायदेशीर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे यासंबंधी आयोजित करण्यात आलेली ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे.
  
मराठा आरक्षणाचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. महाराष्ट्र राज्याची आरक्षण सीमा निश्चित आहे, त्यामध्ये मराठा समाजासाठी आरक्षण इतर समाजांना धक्का न पोहोचवता देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. "कायमस्वरूपी आणि कायदेशीररित्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे." असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. तसेच लवकरच मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी वारंवार दिले आहे. त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी न्यायालय काय निकाल देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@