राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक ९ ऑगस्टला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018
Total Views |

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी येत्या ९ तारखेला निवडणूक घेण्याचा निर्णय राज्यसभेमध्ये घेण्यात आला आहे. राज्यसभेचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी याविषयी घोषणा केली असून ९ तारखेला सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर याविषयी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व सभासदांनी सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
राज्यसभेचे सध्याचे उपसभापती पी.जे.कुरियन यांचा कार्यकाळ या महिन्यामध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे येत्या ९ तारखेला या पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे निवडणुकांची तारीख अगदी जवळ आलेली असताना देखील रालोआ आणि संपूआकडून अजून देखील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. राज्यसभेमध्ये विरोधकांकडे कमी जागा असल्यामुळे त्यांनी आपला उमेदवार अजून देखील जाहीर केलेला नाही. तर रालोआकडे देखील बहुमत नसल्यामुळे भाजपने देखील अजून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.
दरम्यान याविषयावर चर्चा करण्यासाठी म्हणून केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निवासस्थानी एक विशेष बैठक देखील बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये भाजप नेत्यांमध्ये या निवडणुकीसंबंधी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच आपल्या उमेदवाराच्या नावावर देखील भाजपकडून शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपची या बैठकीत आणि येत्या ९ तारखेला नेमके काय होणार ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@