सोनिया गांधींचे निकटवर्तीय संशयाच्या भोवऱ्यात?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018
Total Views |


 


अहमद पटेल यांनी लाच घेतल्याचा ईडीचा आरोप

 

नवी दिल्ली : काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी स्टर्लिंग बायोटेक प्रकरणात २५ लाख रुपयांची लाच घेतल्याचे ईडीने आरोप केले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात माहिती सादर करताना ईडीने हे आरोप केले असून, "अहमद पटेल यांच्या घरी २५ लाख रुपये पोहचले असल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत आणि आम्ही ते लवकरच कोर्टात सादर करू असे ईडीने स्पष्टीकरण दिले आहे. सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय असणारे पटेल यांच्यावर या पूर्वीही ईडीने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

 

ईडीच्या आधिकाऱ्यांनी न्यायालयात माहिती देताना सांगितले, "पटेल यांच्याविरूद्ध आमच्याकडे साक्षीदारांचे जबाब, त्यांचे फोन वरील संभाषण तसेच पैशाच्या देवाण घेवाणीचे पुरावे देखील आहेत." दरम्यान, माहितीनुसार राकेश चंद्रा नावाच्या व्यक्तीने कबूल केले आहे कि, अहमद पटेल यांच्या घरी मी २५ लाख रुपये पोहचवले होते. यामुळे पटेल यांचे पाय अजून खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@