हिरोशिमा, नागासाकी अणुस्फोट पीडितांना श्रद्धांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018
Total Views |
 

 
 
 
नवी दिल्ली : हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये जो अणुस्फोट झाला होता त्या अणुस्फोटाला आज ७३ वर्ष पूर्ण झाले या दिवसानिमित्त आज लोकसभेत या अणुस्फोटात जे पिडीत नागरिक होते त्यांच्या स्मरणाप्रीत्यर्थ त्यांना श्रद्धांजली देण्यात आली आहे. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी याविषयी माहिती देत या अणुस्फोटात जे पिडीत नागरिक होते त्यांना श्रद्धांजली देण्याची विनंती सभासदांना केली. 
हिरोशिमा शहरावर दुसर्‍या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा हल्ला झाला होता. दुसऱ्या महायुद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने नवीनच तयार करण्यात आलेल्या अणुबॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. अणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. ६ ऑगस्ट १९४५ ला अणुस्फोट करण्यात आला होता. 
तसेच जपानमधील नागासाकी शहरावर देखील ९ ऑगस्ट १९४५ रोजी बॉक्सकार नावाच्या बी.२९ विमानाने फॅट मॅन नावाचा अणुबॉम्ब नागासाकी शहरावर टाकून हे शहर बेचिराख करण्यात आले होते. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@