मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018
Total Views |

१२३ व्या घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यसभेत मंजूरी

 
 
  
 
नवी दिल्ली : आज मागासवर्गीय विधेयकाला म्हणजेच एसटीएसससी मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देणाऱ्या म्हणजेच १२३ व्या घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यसभेत मंजूरी मिळाली आहे. हा केंद्र सरकारचा मोठा विजय असून एक ऐतिहासिक निर्णय राज्यसभेत घेण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा मिळाला आहे. लोकसभेत यापूर्वीच या विधेयकाला मंजूरी देण्यात आली होती आज राज्यसभेतही ती मिळाल्यामुळे आता मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
 
 
 
 
"देशासाठी हा एक अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे. मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज मागास वर्गीय विधेयक पारित करण्यात आले आहे. यामुळे ओबीसी समाजातील नागरिकांना मोठा लाभ मिळेल, तसेच मुख्यप्रवाहात आल्यामुळे सगळ्यांचाच विकास होईल." अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. 
 
 
 
 
 
 
तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी "मागास वर्गाला मुख्यप्रवाहात आमून त्यांचा विकास करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे, आणि आजच्या या ऐतिहासिक घटनेने हे सिद्ध केले आहे. हे विधेयक राज्यसभेत लागू करण्यात आले, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूप खूप शुभेच्छा." अशा शब्दात आपला आनंद व्यक्त केला आहे.
 
 
 
 
मागास समाजांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. आणि त्यांच्या या धोरणामुळेच आज भाजप सरकारला आणखी एक मोठा विजय मिळाला आहे. लोकसभेत देखील "एसटीएससी विधेयक" पारित करण्यात आले, यासाठी केंद्र सरकारचे अभिनंदन" असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@