आयुक्‍तसाहेब नको तुम्ही कमीच बोला..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018
Total Views |



 

मंत्री गिरीष महाजन यांचा आयुक्त मुंढेना सल्ला

नाशिक : नाशिकच्या पटलावर सातत्याने चर्चेत असणारे नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि महानगरपालिकेतील इतर घटक यांचा संघर्ष नवा नाही. तसेच या ना त्या विषयावरून आयुक्तची आणि राजकारणी, नगरसेवक यांची खडाजंगी, मानापमान नाट्य आणि तक्रारी नव्या नाहीत. मात्र रविवारी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत याबाबत आणखी नवीन काही पाहायला मिळाले.  नगरसेवकांनी उद्यानात बसविण्यात येणाऱ्या खेळण्यांविषयी महापालिका प्रशासनावर टीका केली. महापालिका प्रशासनावर टीका म्हणजे नगरसेवकांनी आयुक्तांवर नथीतून तीर मारला होता. नगरसेवकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी सरसावत मुंढे यांनी, “मी उत्तर देऊ का?” असे विचारले. नगरसेवक आणि प्रशासनातील इतर जणांना नेहमीच कायद्याच्या चौकटीत बांधून गपगार करणारे आयुक्त मुंढे काय बोलतील? काय नाही, या विचारात सगळेच शांत झाले. ही वादळापूर्वीची शांतता असावी, असाही कयास काही अनुभवी नगरसेवकांनी बांधला. उपस्थित नगरसेवक आणि मुंढेंच्या मनातली खळबळ ओळखून की काय पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप केला. महाजन यांनी मुंढे यांना चक् सल्ला दिलाआयुक्तसाहेब नको. तुम्ही कमीच बोला.” महाजन यांच्या सल्ल्याने बैठकीचा नूरच पालटला. बैठकीत महत्त्वाचे विविध विषय चर्चेला असतानाही उपस्थितांमध्ये मी बोलू का? हा आयुक्तांचा प्रश्न आणितुम्ही कमीच बोला,’ हा मंत्रीमहोदयांचा सल्लाच चर्चिला जात होता.

 

वादळी कारकीर्द आणि नेहमीच वादाच्या भोवऱ्या त असणारे आयुक्त मुंढे यांच्या कामाच्या धडाक्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. तरीही त्यांच्या निर्णयामुळे अनेकांच्या छातीत धडकी भरते हे मात्र खरे. नियमानुसार नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रतिसाद द्यावा हे प्रशासनाचे धोरण आहे, पण आयुक्त मुंढेंच्या कारकिर्दीत जेव्हा जेव्हा असे प्रश्‍नात्तरांचे तास होतात, त्यावेळी तासासोबत त्रासही वाढतो, ही नगरसेवकांच्या मनातली खंत आहे. त्यामुळे महापालिकेच्या  महासभेत असा विषय आल्यावर आयुक्त मुंढे यांना बोलू दिले जात नाही. असे अनेकदा घडले आहे.  वादाला प्रतिवाद, पुन्हा वाद ही नाशिक महानगरपालिकेची संस्कृती बनत चालली आहे की काय असे नाशिककरांसकट इतरांनाही वाटू लागले आहे. कारण महानगरपालिकेच्या अखत्यारितला कोणताही प्रश्न असो, कोणतीही समस्या असो, कोणताही मुद्दा असो, वादाशिवाय, अपवादाने निर्णय झाले आहेत. महानगरपालिका प्रशासन आणि नगरसेवक, महानगरपालिका प्रशासन आणि महानगरपालिकेतील कर्मचारी अशी चौरंगी लढतच असते. या चौरंगी लढतीत पुन्हा जागृत नाशिककरांची त्याच मुद्द्यावरची लढाई वेगळीच असते. महानगरपालिका वादाचा आखाडा बनू नये म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारच्या जिल्हा नियोजन बैठकीत, ‘मी बोलू का,’ असे विचारणाऱ्या मुंढेना सल्‍ला दिला, “आयुक्तसाहेब नको, तुम्ही कमीच बोला.”

@@AUTHORINFO_V1@@