होमियोपॅथीची मूलभूत तत्त्वे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018
Total Views |


 

अठराव्या शतकात ज्यावेळी डॉ. सॅम्युअल हॅनेमान यांनी होमियोपॅथी जगापुढे आणली, त्यावेळी अनेक संशोधनांनंतर त्यांनी होमियोपॅथीची काही मूलभूत तत्त्वे तयार केली. ही तत्त्वे मुख्य:त्वे निसर्गाच्या मूलतत्त्वावर अवलंबून असल्याने कुठल्याही काळात अत्यंत सत्य आहेत.

 

त्यांनी होमियोपॅथीची जी तत्त्वे सिद्ध केली, ती खालील प्रमाणे-

 

1) Law of similia - समानतेचा नियम.

2)Law of simplex- एक औषधाचा नियम.

3) Law of minimum dose - सूक्ष्म मात्रेचा नियम.

4) Doctrine of Drug proving - औषध सिद्धतेची परिमाणे

5) Theory of Chronic disease - जुनाट आजाराचा सिद्धांत.

6) Theory of Vital Force - चैतन्यशक्तीचा सिद्धांत.

7) Doctrine of Drug-dynamization - औषधनिर्मिती व मात्रेची परिमाणे

 

आता आपण या मूलभूत तत्त्वांची एकामागोमाग एक अशी माहिती घेऊया.

 
1) Law of Similia - समानतेचा नियम :

होमियोपॅथीचे औषधशास्त्र हे एका निश्‍चित नियमाला अनुसरून आहे. हा नियम म्हणजे सिमीलिया, सिमीलिकस क्युरॅन्टर म्हणजेच समानतेच्या तत्त्वावर रोग बरा करणे. (like cures like)  मुळात ‘होमियोपॅथी’ हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. ‘होमिऑस’ म्हणजे समान (Similar) आणि ‘पॅथॉस’ म्हणजे (Suffering) सहन करणे. म्हणूनच होमियोपॅथीची व्याख्या ही समानतेच्या गुणधर्मावर केली जाते. लक्षणे व चिह्न यांच्या समानतेवर औषधे निश्चित केली जातात. म्हणूनच होमियोपॅथीला ‘समचिकित्सा पद्धती’ असेही म्हटले जाते. रुग्णांमध्ये आढळणारी रोगाची लक्षणे चिन्ह यांचा व्यवस्थित अभ्यास केला जातो व त्या लक्षणांच्या समान अशी औषधातील लक्षणे तपासली जातात. जर दोन्ही लक्षणे समान असतील, तर ते औषध हे त्या रुग्णाचे त्या वेळच्या आजारासाठीचे औषध नसते.

 

समानतेचा नियम हा नवीन नियम नाही. हा नियम तर निसर्गाचा नियम आहे. (जेचर्स लॉ ऑफ क्युअर) हा नियम निसर्गात मूलभूत आहे आणि याच नियमांवर बरे होण्याची व रोगमुक्‍त होण्याची प्रक्रिया अवलंबून आहे. हा नियम अनादी काळापासून जरी अस्तित्वात असला तरी अतिप्राचीन हिंदू तत्त्ववेत्त्यांनी याचे उपयोग लिहून ठेवले आहेत. या शिवाय ‘हीप्पोकॅ्रटीस’ ज्याला आपण औषधशास्त्राचा जनक म्हणतो, त्यानेही काही अनुभव लिहून ठेवले आहेत. त्यात या समानतेच्या नियमांचा उल्लेख आहे. डॉ. सॅम्युअल हॅनेमान हे संशोधक प्रवृत्तीचे होते. त्यांनी त्यांच्या संशोधनातून हे जाणले की, या समानतेच्या नियमांवरच माणूस पूर्णपणे रोगमुक्‍त होऊ शकतो. म्हणून त्यांनी या नियमाला सिद्ध करण्यासाठी त्यांच्यावर त्यांच्या सहकार्‍यांच्या मदतीने अनेक प्रयोग केले व या प्रयोगांती प्रत्येक वेळी त्यांना या समानतेच्या नियमांची (low of similars)

 

सत्यता पटली. या नियमांच्या अनुसारच त्यांनी सिमीलिया, सिमीलिबस, क्युरॅन्टर हा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार, रोग्याला रोगमुक्‍त करणारे औषध हे निरोगी माणसांवर प्रथम सिद्ध केले जाते व त्याची लक्षणे व चिन्हे नमूद करून ठेवण्यात येतात. जे औषध निरोगी माणसांमध्ये काही लक्षणांचा समूह निर्माण करते, तशीच लक्षणे जर आजारी माणसामध्ये आढळली, तर तेच औषध आजारी माणसामधील ती लक्षणे पूर्णपणे बरी करू शकते, हे या नियमाचे सार आहे. पुढील भागात आपण होमियोपॅथीच्या पुढील मूलभूत तत्त्वाविषयी माहिती घेऊया.

-डॉ. मंदार पाटकर

@@AUTHORINFO_V1@@