लिव्हर सिरॉसिस म्हणजे काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018
Total Views |


 

यकृताचे आजार हे भारतातील मृत्यूंच्या १० प्रमुख कारणांपैकी एक आहेत. सिरॉसिस हा एक काळाप्रमाणे वाढत जाणारा आजार आहे आणि यामुळे यकृताच्या पेशींचा नाश होतो यकृताच्या पेशींवर कधीही भरून निघणारे दुष्परिणाम होतात.
 

यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि अनेक क्लिष्ट अशा प्रकारची कार्ये ती करते. मेदपदार्थांचे पचन, महत्त्वाच्या प्रथिनांचे एकीकरण, रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रक्रिया नियंत्रित करणे, विषारी घटकांना दूर करणे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे ही यांच्यापैकी काही महत्त्वाची कामे आहेत. यकृताचे आजार हे भारतातील मृत्यूंच्या १० प्रमुख कारणांपैकी एक आहेत. सिरॉसिस हा एक काळाप्रमाणे वाढत जाणारा आजार आहे आणि यामुळे यकृताच्या पेशींचा नाश होतो यकृताच्या पेशींवर कधीही भरून निघणारे दुष्परिणाम होतात.

 

लिव्हर सिरॉसिस हा आजार प्रामुख्याने ४० ते ४५ वर्षे या सरासरी वयोगटात आढळतो. पण असेही आढळले आहे की, मद्यपानाच्या अतिरेकामुळे, चुकीच्या आहारामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे हा आजार आता तरुणांमध्येही दिसू लागला आहे. यात प्रामुख्याने असे तरुण व्यावसायिक असतात, ज्यांच्या कामाच्या निश्चित वेळा ठरलेल्या नसतात आणि अतिरिक्त मद्यपान, अरबटचरबट खाणे व्यायाम करणे या वाईट सवयींमुळे त्यांच्यातफॅटी लिव्हरनावाची अवस्था निर्माण होते आणि त्याचेच रुपांतर मग लिव्हर सिरॉसिसमध्ये होते.

 

लिव्हर सिरॉसिस असलेल्या रुग्णांमध्ये या रोगाची चिन्हे फार कमी प्रमाणात दिसतात किंवा मुळीच दिसत नाहीत. यातील काही प्रमुख चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे :

१) भूक लागणे.

२) त्वचा पिवळी पडणे. (कावीळ)

) थकवा आणि अशक्तपणा.

४) अंगाला खाज येणे.

) सहज इजा होणे.

) ओटीपोटात द्रव साठणे. (असायटीस)

) पायांवर सूज येणे.

) स्नायूंची घनता कमी होणे.

यकृताची हानी करणारी अनेक कारणे आहेत, ज्यांचे पर्यवसन लिव्हर सिरॉसिसमध्ये होते. त्यातील काही खालीलप्रमाणे :

) अतिमद्यपान. (नियमितपणे/दररोज)

) मद्यपानाशी संबंधित नसलेले फॅटी लिव्हर आजार जे सर्वसाधारणपणे लठ्ठपणा आणि मधुमेहाशी संबंधित असतात.

४) जुना संसर्गजन्य हिपॅटायटीस बी आणि सी.

५) ऑटोइम्यून हिपॅटायटीस

६) अनुवांशिक आजार

लिव्हर सिरॉसिसचे टप्पे

सिरॉसिस हा असा टप्पा आहे, जिथे यकृताची आधीच हानी झालेली असते. लिव्हर सिरॉसिसचे दोन महत्त्वाचे टप्पे म्हणजे :

टप्पा : नुकसान भरून काढण्याजोगा सिरॉसिस - या बाबतीत लिव्हरची झालेली हानी निरोगी लिव्हर पेशींनी भरून काढली जाऊ शकते, म्हणजेच लिव्हरची हानी कुठल्याही गुंतागुंतीशिवाय भरून काढण्याची क्षमता या पेशींमध्ये असते आणि रुग्णात कुठल्याही प्रकारची लक्षणे किंवा चिन्हे दिसत नाहीत.

 

टप्पा : नुकसान भरून काढण्याजोगा सिरॉसिस - या टप्प्यात पोटात आणि पायांमध्ये द्रव साठणे, कावीळ, यकृताचा कर्करोग, रक्ताच्या उलट्या आणि इतर गुंतागुंती निर्माण होतात. या प्रकारचा सिरॉसिस झालेल्या रुग्णांची आयुर्मर्यादा सुमारे दीड वर्षाची असते.

 

हा जीवघेणा आजार टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे -

) मद्यपान टाळा.

) संतुलित आहार घ्या, योग्य पोषणमूल्ये असलेला - डाळी, प्रथिने, दुग्धजन्य पदार्थ, फळे आणि भाज्या असलेला आहार घ्या. लठ्ठपणा टाळा.

३) असुरक्षित यौनसंबंध, वापरलेल्या सुया टाळा आणि रक्ताशी किंवा इतर शारीरिक द्रावांशी थेट संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्या. रक्त किंवा इतर शारीरिक द्रावांवर एच.बीव्ही आणि एच.सीव्ही यांचा संसर्ग झालेला असू शकतो.

४) एच.बीव्ही आणि एच.एव्ही यांच्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवा.

(लेखक फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथे प्रमुख सल्लागार आणि हेपाटोबिलीयरी, पॅन्क्रियाटीक सर्जरी आणि लिव्हर ट्रान्सप्लान्टेशन विभाग प्रमुख आहेत.)

-डॉ. राकेश राय

@@AUTHORINFO_V1@@