तुमच्या मुलाला हिपेटायटीसपासून वाचवा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018
Total Views |


 

हिपेटायटीस हा यकृताच्या सुजेचा आजार आहे. तो संसर्गजन्य आहे आणि मातेकडून तिच्या नवजात अर्भकाकडे जाऊ शकतो. हिपेटायटीस ग्रस्त मुलांमध्ये मोठं होत असताना अत्यंत गंभीर गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात.
 

आपले यकृत अनेक महत्त्वाची कार्ये पार पाडते. त्याचा आपल्या शरीराच्या चयापचय क्रियेवर परिणाम होतो. बाइल्सच्या निर्मितीत, शरीरातील विषारी द्रव्ये धुवून काढण्यात, कर्बोदके, फॅट्स आणि प्रथिने इत्यादींचे विघटन करण्यात मदत मिळते. हिपेटायटीस हा यकृताच्या सुजेचा आजार आहे. तो संसर्गजन्य आहे आणि मातेकडून तिच्या नवजात अर्भकाकडे जाऊ शकतो. हिपेटायटीस ग्रस्त मुलांमध्ये मोठं होत असताना अत्यंत गंभीर गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात. विषाणुंच्या स्वरूपानुसार हिपेटायटीसमध्ये , बी, सी, डी आणि असे प्रकार असून ते मुलांमध्ये दिसू शकतात.

. हिपेटायटीस- : ही नवजात बालके आणि मुलांमधील अत्यंत सर्वसामान्य परिस्थिती आहे.

लक्षणे

ताप, मळमळ,उलट्या, भूक लागणे, सातत्याने थकवा, त्वचा आणि डोळे पिवळे होणे

कारणे

• हा आजार दूषित फळे, भाज्या, समुद्री खाद्य आणि इतर अन्न स्रोतांमुळे होतो.

• हात स्वच्छ धुतलेल्या व्यक्तीने तयार केलेल्या आहाराचे सेवन करणे.

• दूषित पाण्याचे सेवन करणे.

प्रतिबंध

12-23 महिने वयोगटातील मुलांमध्ये लसीकरणाची शिफारस केली असून त्यानंतर दर सहा महिन्यांनी दुसरी लस देण्यात यावी. हिपेटायटीस- संसर्गग्रस्त क्षेत्रांत राहणार्या किशोरवयीन आणि तरूण प्रौढ व्यक्तींसाठीही या लसीची शिफारस करण्यात आली आहे.

खख. हिपेटायटीस बी

लक्षणे

हिपेटायटीस बीने ग्रस्त असलेल्या मुलांमध्ये दिसणारी लक्षणे 3 ते 4 महिन्यांनी दिसतात. ती खालीलप्रमाणे आहेत

सांधेदुखी

पोटदुखी

मळमळ आणि उलट्या

कावीळ

पुरळ

गडद रंगाची लघवी होणे

ताप

त्वचा आणि डोळे पिवळे होणे.

कारणे

• हिपेटायटीस-बी :याने ग्रस्त मातेकडून तिच्या नवजात अर्भकाला होते.

• हिपेटायटीस बीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे किंवा रक्ताशी संपर्क होणे.

प्रतिबंध

अत्यंत कमी वयात लहान मुले आणि नवजात बालके यांचे लसीकरण हा हिपेटायटीस बीचा प्रतिबंध करण्याचा योग्य मार्ग आहे. 0-1-6 महिन्यांच्या कालावधीत तीन डोस देणे आवश्यक असून पाच वर्षात बूस्टर द्यावा लागतो.

खखख. हिपेटायटीस-सी :

लक्षणे:

सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना होणे.

- थकवा जाणवणे.

- सातत्याने खूप ताप येणे.

- डोळे आणि त्वचा पिवळी होणे.

- गडद लघवी होणे.

कारणे

• मुलांमध्ये या विषाणुने ग्रस्त मातांमधून हिपेटायटीस सी रूपांतरित होतो आणि गर्भावस्थेदरम्यान मुलांमध्ये रूपांतरित होतो.

• कीडनीने ग्रस्त मुले ज्यांना डायलिसिसची गरज असते.

• हेमोफिलियासारख्या रक्ताच्या गुठळ्यांनी ग्रस्त मुले.

प्रतिबंध

हिपेटायटीस-सीचा प्रतिबंध संपर्क टाळल्याने, दूषित जेवण, दूषित पाण्याचा वापर टाळणे आणि विषाणुने ग्रस्त व्यक्तींशी संपर्क टाळून करता येईल. हिपेटायटीस सीसाठी कोणतीही लस नाही.

खत. हिपेटायटीस-डी

लक्षणे

हिपेटायटीस-डीची लक्षणे हिपेटायटीस बीसारखीच आहेत.

कारणे

हिपेटायटीस-डी स्वतःहून उद्भवत नाही आणि हिपेटायटीस बीच्या संसर्गासोबत तो येतो.

प्रतिबंध

हिपेटायटीस बीसारखीच

.हिपेटायटीस-

लक्षणे

हिपेटायटीस-ईची लक्षणेहिपेटायटीससारख्या इतर संसर्गासारखीच आहेत. यातील काही लक्षणे मळमळ, उलट्या आणि सांधेदुखी ही आहेत.

कारणे

हिपेटायटीस- गर्भावस्थेदरम्यान नवजात बालकांमध्ये परावर्तित होतो. हिपेटायटीस-ईच्या संपर्कात येण्यापासून टाळणे हाच सर्वात मोठा प्रतिबंध आहे.

प्रतिबंध

योग्य स्वच्छता आणि निरोगी जीवनशैली यांच्यामुळे हिपेटायटीस-ईचा प्रतिबंध होतो. नीट हात धुणे, संसर्गापासून मुक्त स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्याची खातरजमा करणे, अन्नाच्या स्रोतांवर लक्ष ठेवणे आणि जेवण वाढण्यापूर्वी त्याचा दर्जा तपासणे या हिपेटायटीस- सोबत संपर्क टाळण्याच्या पद्धती आहेत.

(लेखक एस. एल. रहेजा हॉस्पिटल, माहीम येथे एचओडी- गॅस्ट्रॉएन्टेरोलॉजी आणि एन्डोस्कोपी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)

-डॉ. विनय धीर

@@AUTHORINFO_V1@@