छत्तीसगडमध्ये १४ नक्षलवाद्यांचा खात्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018
Total Views |


 

 

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्‍ह्यात सुरक्षा दलांनी १४ नक्षलींना कंठस्‍नान घातले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्‍त्रास्‍त्रे हस्‍तगत करण्यात आली आहेत. २०० पेक्षा जास्त नक्षलवादी कोंटा आणि गोलापल्‍ली परिसरात जमणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे या परिसरात रविवरापासून सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांचा शोध सुरू होता. याच दरम्यान सुरक्षा रक्षकांना हे मोठं यश मिळाल असून ही कारवाई अद्याप सुरु आहे.

 
 
 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील कोंता भागामध्ये नक्षलवाद्यांविरोधात आज सकाळी कारवाई करण्यात आली. यावेळी जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत १४ नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र साठा जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून हि कारवाई संपण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.

@@AUTHORINFO_V1@@