राष्ट्रपती कोविंद करुणानिधींच्या भेटीला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2018
Total Views |




चेन्नई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज द्रविड मुन्नेत्र कळगम अर्थात डीएमके पक्षाचे अध्यक्ष एम.करुणानिधी यांच्या चेन्नई येथे भेट घेतली आहे. हैदराबाद दौऱ्यावर असलेले कोविंद यांनी आज आपला हैदराबाद दौरा संपून चेन्नई येथे जाऊन करुणानिधी आणि त्यांचे पुत्र एम.के.स्टालिन यांची भेट घेतली आहे. तसेच करुणानिधी यांच्या आरोग्याची चौकशी करत त्यांच्या कुटुंबियांचे देखील सांत्वन केले आहे.

राष्ट्रपती कोविंद हे आज एक दिवसीय तेलंगणा दौऱ्यावर होते. तेलंगणातील आयआयटी हैदराबाद येथील कार्यक्रम उरकून करुणानिधी यांच्या भेटीसाठी म्हणून ते थेट चेन्नई येथे गेले. यावेळी ते थेट करुणानिधी यांना दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयामध्ये गेले. याठिकाणी एम.के.स्टालिन यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर काही काळ अनौपचारिक चर्चा झाल्यानंतर कोविंद यांनी करुणानिधी यांची भेट घेतली. यानंतर करुणानिधी यांच्या कुटुंबियांची देखील त्यांनी भेट घेतली व करुणानिधी यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.


@@AUTHORINFO_V1@@