आजचे मोदीनॉमिक्स उद्याचे धर्मानॉमिक्स!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2018
Total Views |


 

 
बहुचर्चित मोदीनॉमिक्स या पुस्तकाचे प्रकाशन
 

ठाणे : ‘‘दुबळी जनता आणि भ्रष्ट राजा शा स्थितीतू २०१४ साली परिवर्तन घडले. लोककल्याणाच्या व्याख्याच बदलल्या गेल्या कारण राजनीतीकडे बघण्याची प्रेरणाच भिन्न आहे. अंत्योदयाकडे दीर्घकालीन वाटचाल करीत असतांना मोदी हे ट्रेंड सेटर म्हणून उभे राहिले आहेत. पाश्चात्त्य संकल्पनेतू राजकारण, अर्थकारणाला बाहेर काढून नव्या व्यवस्था मोदी आणत आहेत. आजचे मोदीनॉमिक्स हे धर्मानॉमिक्स म्हणून ओळखले जाईलअसा विश्वास रा.स्व.संघ अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे यांनी येथे बोलताना व्यक्त केला.

 

दीनदयाळ प्रेरणा केंद्र, ठाणे अर्चिस बिझनेस सोल्युशन्स् यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोवीलकर यांच्या मोदीनॉमिक्स या पुस्तकाचे प्रकाशन आज गडकरी रंगायतन येथे पार पडले. रा.स्व.संघ अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे, मल्टी कमोडीटी एक्सचेंज ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मृगांक परांजपे, अर्चिजचे व्यवस्थापकीय संचालक संजय ढवळीकर, केंद्राचे अध्यक्ष भा.वा.दाते, कार्यवाह मकरंद मुळे, सदस्य संजीव ब्रह्मे, कल्पना राईलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अनिरूद्ध देशपांडे बोलत होते.

 

असंख्य वर्षांचे अपयश झाकण्यासाठी काही लोकांना जबरदस्ती मिठी मारावीशी वाटते, द्योजक आणि त्यांनी केलेल्या गुंतवणुकीकडे संशयाने पाहिले जाते, शिक्षण आणि आरोग्याचे व्यापारीकरण रोखण्याची गरज अधोरेखित होत असतांना या सुमारास मोदी यांनी भ्रष्टाचारविहीन राज्यव्यवस्था आणली आहे. अनेक गोष्टी केल्या आहेत, काही राहिले आहे. हे जे राहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा संधी मिळायला हवी, त्यासाठी त्यांच्या पाठी उभे राहिले पाहिजे अशी अपेक्षा देखील प्रा. देशपांडे यांनी व्यक्त केली.

 

धोरण लकवा, प्रचंड भ्रष्टाचार, जनकल्याणाच्या नावाने सुरू असलेल्या योजनांच्या अंमलबजावणी होत असलेला पेलवणारा खर्च, वित्तिय बेशिस्त वित्तिय अशहाणपणा असा पूर्वेतिहास घेऊन २०१४ साली मोदींनी सूत्रे स्वीकारली. गेल्या चार वर्षा भारतीय अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत १० वरून वर झेपावली, विकासाचा दर चीनपेक्षाही जास्त झाला, भाववाढीची पातळी १४ वरुन साडेतीन क्क्यांवर आली, द्यो सुलभतेच्या बाबतीत १४०हून १००व्या क्रमांकावर आलो, हा मोठा टप्पा अवघ्या चार र्षां पार पाडला गेला. यामागे नक्कीच एक सूत्र होते. केवळ योजना आखता त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सरकार आग्रही राहिले. जनधन, ज्ज्वला, अटल पेन्शन योजना सारख्या अंत्योदयाच्या योजना आणत असताना त्यांच्या अंमलबजावणीवर होणारी जवळपास ९० हजार कोटींची बचत करून थेट लाभार्थ्यांना लाभ पोहोचवण्याचे काम सरकाने केले असे विश्लेषण करत लेखक डॉ. विनायक गोवीलकर यांनी मोदीनॉमिक्स पुस्तकाच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली. मोदींची चार वर्षांतील अर्थनीती समजू घेण्यासाठी मोदीनॉमिक्स पुस्तक नक्की उपयोगी ठरले, असा विश्वास कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मृगांक परांजपे यांनी व्यक्त केला.

@@AUTHORINFO_V1@@