आज मुंबईच्या तीनही रेल्वेमार्गांवर मेगा ब्लॉक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2018
Total Views |

मुंबई : रविवार असल्या कारणाने आज मुंबई येथे रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी प्रवास करणाऱ्या लोकांना या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. विविध कामांसाठी हा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद, हार्बरवरील पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते माहीम अप आणि डाऊन या दरम्यान हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
 
 
 
रेल्वेच्या काही तांत्रिक कामासह रूळ, ओव्हरहेड वायर दुरुस्तीसाठी आज मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग व हार्बर तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. या मेगाब्लाॉकमुळे सर्वच मार्गावरील लोकल गाड्या उशिराने धावतील.
 
मध्य रेल्वे मार्ग : 
मध्य रेल्वे-मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक. 
 
हार्बर रेल्वे मार्ग :

पनवेल ते वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत हा मेगाब्लाॉक घेतला जाणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्ग :

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते माहीम अप व डाऊन या जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दु. ३.३० वाजेपर्यंत हा मेगाब्लाॉक घेतला जाणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@