नोव्हेंबर २०१८ पर्यंत मराठा आरक्षणाची वैधानिक कारवाई पूर्ण करणार : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2018
Total Views |





मुंबई : राज्य मागासवर्गीय आयोगाने आपला अहवाल सादर केल्यानंतर येत्या नोव्हेंबर २०१८ पर्यंत मराठा आरक्षणाची वैधानिक कारवाई पूर्ण करणार येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधताना आज ते बोलत होते.


मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण मिळावे यासाठी म्हणून राज्य सरकारने सर्वात प्रथम कायदा निर्माण केला. परंतु उच्च न्यायालयाने त्या कायद्याला स्थगिती दिली होती. यासाठी म्हणून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने देखील यावर निर्णय देण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा उच्च न्यायालयाकडे येऊन यावर कारवाई सुरु करण्यात आली होती. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या निकषांवर आधारित अहवाल तयार करण्यासाठी म्हणूनच सरकारने मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली. तसेच अहवाल तयार करण्याचे काम देखील आयोगाला देण्यात आले आहे. यासाठी म्हणून आयोग १ लाख ८५ हजार पुराव्यांचा अभ्यास करत आहे. तसेच ही संस्था सरकारी अधिकारांमधून जरी तयार झाली असली तरी देखील ती पूर्णपणे स्वायत्त असून त्यामध्ये सरकार कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे आयोग लवकरच आरक्षणाविषयी आपला अहवाल सादर करेल व त्यानंतर एका महिन्याच्या आत आणि जास्तीतजास्त नोव्हेंबर महिन्याअखेरपर्यंत मराठा आरक्षणाची वैधानिक कारवाई पूर्ण केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


आरक्षण लागू होईपर्यंत मेगाभरती नाही


मराठा समाजातील तरुणांमध्ये सध्या मेगाभरतीविषयी सध्या संभ्रमाचे वातावरण असून मेगाभरतीमध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही, असा त्यांचा समज आहे. परंतु सरकारने मेगाभरतीला स्थगिती दिली असून जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा सुटत नाही, तोपर्यंत राज्यामध्ये मेगाभरती घेतली जाणार नाही, असे देखील त्याने यावेळी स्पष्ट केले.


धनगर आणि अल्पसंख्याकांचा मुद्दादेखील सोडवणार


मराठा समाजाबरोबरच राज्य सरकार धनगर समाज आणि अल्पसंख्यांक समाजासाठी देखील कार्य करत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. धनगर समाजासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अहवाल ऑगस्ट अखेरपर्यंत मिळणार आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर धनगर आरक्षणाच्या कामाला देखील गती देण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही समाजाने मनात कसलाही किंतुपरंतु बाळगू नये, असे देखील त्याने म्हटले.


आत्महत्या आणि जाळपोळीमुळे राज्याची प्रतिमा खराब होत आहे


आपल्या भाषणाशेवटी फडणवीस यांनी मराठा तरुणांना आत्महत्या तसेच जाळपोळ न करण्याचे देखील आवाहन केले आहे. राज्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक येऊ लागली आहे. परंतु सततची आंदोलने, आत्महत्या आणि जाळपोळीमुळे राज्याची प्रतिमा खराब होऊ लागली आहे. त्यामुळे मराठा तरुणांनी स्वतःच याविषयी विचार करावा आणि राज्याची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी म्हणून प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.


@@AUTHORINFO_V1@@