मध्याह्न भोजन ते कोट्यवधींचे साम्राज्य!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 

नानजुंदी यांच्या या यशानं प्रभावित झालेल्या सराफ व्यावसायिकांनी त्याला आपला नेता घोषित केलं आहे आणि आता ते ‘अखिल कर्नाटक विश्‍वकर्मा महासभे’चे अध्यक्ष आहेत. नानजुंदी यांनी व्यवसायाच्या विस्तारासोबतच समाजाच्या कल्याणासाठीही बरंच काही केलं आहे. कोणत्याही अडचणीमुळं खचून न जाता जोमानं प्रयत्न केले, तर यश हमखास मिळतंच हाच आदर्श नानजुंदी यांनी आपल्या जीवनातून घालून दिला आहे.
 

तुम्हाला बदल घडलेला बघायचा असेल, तर त्याची सुरुवात स्वत:पासूनच केली पाहिजे.“ हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे शब्द आहेत. विषम परिस्थितीत नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा स्वत: मेहनत करण्याची तयारी ठेवून हातपाय हलविले, तर जीवनाला नक्कीच कलाटणी देऊन यशोशिखर गाठता येतं, हे अनेकांनी आपल्या कर्तृत्वानं दाखवून दिलं आहे. त्यापैकीच एक नाव आहे ते म्हणजे बंगळुरूचे कुल्लाचार नानजुंदाचार. बालपणी शाळेत मिळणाऱ्या मध्याह्न भोजनावर अवलंबून असलेली ही व्यक्ती आज दक्षिण भारतातील नावाजलेली सराफ व्यावसायिक बनली असून, त्यांच्या कंपन्या आणि शोरूम्सची उलाढाल १५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.

 

बंगळुरूच्या विनोबानगर या तुलनेनं गलिच्छ असणाऱ्या वस्तीत राहणारे कुल्लाचार नानजुंदाचार, पालक आणि सात भावांचं पोट भरण्यासाठी नगरपालिकेच्या शाळेत मिळणारे मध्याह्न भोजन घेऊन जात असत. ते भोजनही इतक्या सहजासहजी मिळत नसे. ही साडेतीन दशकांपूर्वीची परिस्थिती होती. परंतु, कुल्लाचार यांनी अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर नशिबालाही बदलण्यास भाग पाडलं. आज पन्नाशी गाठलेले नानजुंदाचार त्यांच्या शाळेतील रेकॉर्डमध्ये असलेल्या नावानं ओळखले जात नाहीत. आता ते के. पी. नानजुंदी आणि श्री लक्ष्मी गोल्ड पॅलेस चेनचे मालक म्हणून ओळखले जातात. संपूर्ण कर्नाटकात नानजुंदी हे नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. दोन वर्षांपूर्वी ८०० कोटींची उलाढाल असलेल्या नानजुंदी यांच्या व्यवसायाने आता हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बंगळुरू, मंगळुरू, हुबळी आणि बेळगाव येथे नानजुंदी यांच्या सात सराफ पेढ्या आहेत. गोव्यासह आणखी सहा ठिकाणी त्यांनी सराफ व्यवसाय सुरू केला आहे. शिवाय त्यांची पाच सिल्क शोरूम्स आहेत. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण शोरूम्स ही चार मजली असतात आणि त्यामधील प्रत्येक दोन मजल्यांवर सिल्क आणि सोने-चांदीचा व्यवसाय असतो. मध्य कर्नाटकतील दावणगिरी येथे चित्रपटगृह, म्हैसूर येथे स्टार हॉटेल उभारण्याचंही काम सुरू आहे.

 

परंतु, हे शक्य तरी कसं झालं? आपल्या जीवनाचा अनोखा प्रवास उलगडताना नानजुंदी आपसूकच भावूक होतात आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूही तरळतात. ”आपल्यासह भावंडांचं पालनपोषण करताना वडिलांची होत असलेली दमछाक त्यांना आठवते. खाद्यान्नांमध्ये सर्वात स्वस्त असलेली रागी घेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसायचे. झोपडपट्टीत राहत असताना पिण्याच्या पाण्यापासून ते भाजीपाला आणि खाद्यान्न हे सगळं निकृष्ट दर्जाचं मिळत होतं.“ असं सांडपाण्याच्या नाल्याच्या बाजूला असलेल्या आपल्या घराची कहाणी सांगताना ते म्हणाले. ”बंगळुरूच्या एच. सिद्धय्या रोडवरील पादचारी मार्ग हे माझ्यासह वस्तीतील इतर पुरूषांसाठी प्रात:विधी उरकण्याचं ठिकाण होतं. वस्तीत फक् दोनच शौचालये होती आणि त्याचा वापर महिला करायच्या. कधीकाळी अजूनही मी बालपण घालवलेल्या झोपडपट्टीत जातो,“ असं आज बंगळुरूच्या व्यावसायिक वर्तुळातील मोठं प्रस्थ असलेल्या नानजुंदी यांनी सांगितलं.

 

आधीची अनेक वर्षे त्यांना अजूनही खुपतात. नानजुंदी झोपडपट्टीत राहत होते, असं समजल्यानंतर शाळेतील मुलांनी त्यांच्यापासून दूर राहणंच पसंत केलं. त्यांच्या आईनं फुलं विकून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला. सोनार असलेल्या आपल्या वडिलांकडून नानजुंदी यांनी दागिन्यांचे पॉलिश, दुरूस्ती आणि नवे दागिने तयार करण्याचं कौशल्य प्राप् केलं. परंतु, त्यांनी तयार केलेले दागिन्यांचे लहान तुकडे मोठ्या सराफपेढ्यांमध्ये विकणं कठीण काम होतं. पेढीचे मालक त्यांना घाण समजत आणि भेटीसाठी तीन-चार तास रखडून ठेवत. आठ मुलांपैकी चौथे असलेले नानजुंदी हे सातवीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आणि नंतर चांगल्या शाळेत प्रवेश घेतला. परंतु, जीवनातील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नव्हत्या. नानजुंदी महाविद्यालयात असताना त्यांच्या वडिलांचं यकृताच्या कर्करोगानं निधन झालं. त्यानंतर आई भाऊ मद्याच्या आहारी गेले.

 

अशातच नानजुंदी यांनी अठराव्या वर्षात पदार्पण केलं. गरिबी, उपासमार, अपमान आणि मृत्यू या सर्व गोष्टी त्यांच्या कुटुंबात घडल्या. मोठं कुटुंब असल्यानं त्यांचं पोट भरण्याच्या दृष्टीने मद्य किंवा धूम्रमान हा त्यांच्यासमोर पर्यायच नव्हता. त्यामुळे सकाळी ते वडिलांचा व्यवसाय चालवत असत. सायंकाळी महाविद्यालय आटपून रात्री रिक्षा चालवत. फेर्यांच्या दरम्यान जेवढी होईल तेवढीच त्यांची झोप होती. परंतु, एवढे काबाडकष्ट केल्यानंतरही अडचणी संपता संपेनात. अखेर पतीनं दिलेलं १५ ग्रॅमचं मंगळसूत्र दे, अशी गळ त्यांनी आपल्या विवाहित बहिणीला घातली. बहिणीनं आनंदानं ते त्याला दिलं. नानजुंदी यांनी त्या मंगळसूत्रातून लहान लहान दागिने तयार केले आणि मोठ्या किरकोळ सराफ व्यापार्यांना विकले. ”माझे दागिने विकावे, यासाठी मी व्यापार्यांचे अक्षरश: पाय धरत असे. मी चोरीच्या सोन्यातून ते तयार केले, असाही संशय काहीजण घेत. परंतु, वडिलांना ते ओळखत असल्याने हळूहळू माझी स्वीकार्यता वाढू लागली. बहुधा या स्वीकार्यतेमुळेच त्यांनी १०० रुपयांचा चष्माही घेतला. झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालो आणि बळकट स्नायू असल्याने माझ्या व्यक्तिमत्त्वात ती नजाकत नव्हती. त्यामुळं मी हूड दिसण्यापेक्षा मवाळ दिसण्यासाठी लूकमध्ये बदल केला आणि डोळ्यांवर चष्मा घालण्यास सुरुवात केली,“ असा झिरो नंबरचा चष्मा उतरवताना नानजुंदी म्हणाले. त्यांची ही क्लृप्ती चांगलीच कामी आली. आणखी काही महिने संघर्ष केल्यानंतर त्यांना चांगलं उत्पन्न मिळू लागलं. त्यांनी मग हळूहळू पाच रिक्षा एक कार्गो व्हॅन खरेदी केली. जवळच्याच भागात घर भाड्याने घेऊन कुटुंबाला तिथं हलवलं. स्वतंत्र किचन, हॉल, स्वच्छतागृह आणि वीज यामुळे तो एकप्रकारे राजमहालच होता. ”प्रथमच घरात विजेचा वापर केला, तेव्हा मी १८ वर्षांचा होतो,“ असे नानजुंदी म्हणाले.

 

जॅकी चॅनची जादू

कालांतरानं नानजुंदी यांनी एक सराफ दुकान उघडलं आणि ते लहान भावाच्या हवाली केलं. वर्ष पुढे सरकत गेली आणि आर्थिक परिस्थिती सुधारली. मग नानजुंदी यांनी ॅक्शन स्टार जॅकी चॅनच्या चित्रपटांचं वितरण सुरू केलं. चेन्नई येथून ते रीळं आणत आणि बंगळुरूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचं वाटप करत. या प्रक्रियेत त्यांना बराच आर्थिक लाभ झाला. यातून नंतर त्यांनी चित्रपटांना अर्थसाहाय्य करण्यास प्रारंभ केला आणि कालांतराने ते कन्नड चित्रपट सृष्टीतील आघाडीचे वित्तपुरवठादार झाले. नंतर त्यांनी तीन कन्नड चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांचा नावलौकिक वाढताच आघाडीचे कन्नड चित्रपट निर्माते त्यांच्या घरी येऊ लागले. अशाच एका घटनेत चित्रपटक्षेत्रातील मोठ्या व्यक्तीनं त्यांना टोमणा मारला, ’यांच्यासारखी लोकं फक् अर्थपुरवठा करण्याच्याच लायकीचे असतात. त्यांना अभिनयातलं काहीच कळत नाही.‘ ”मी झोपडपट्टीतून आलो असल्यानं माझ्याकडं गमावण्यासारखं काहीही नाही,“ असं उत्तर त्यांनी दिलं. ”मात्र, आज मी खूप लांब अवघड डायलॉग एका शॉटमध्ये म्हणू शकतो,“ असा त्यांनी दावा केला.

 

नानजुंदी यांच्या या यशानं प्रभावित झालेल्या सराफ व्यावसायिकांनी त्यांना आपला नेता घोषित केलं आणि आता तेअखिल कर्नाटक विश्वकर्मा महासभेचे अध्यक्ष आहेत. नानजुंदी यांनी व्यवसायाच्या विस्तारासोबतच समाजाच्या कल्याणासाठीही बरंच काही केलं आहे. जीवनात यशस्वी प्रवास सुरू असताना १० वर्षांपूर्वी आणखी एक वेगळी कलाटणी मिळाली. त्यांच्या गाडीला अपघात झाला. चालक थोडक्यात बचावला. परंतु, महासभेतील त्यांच्या तीन सहकार्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नानजुंदी यांना खाजगी हेलिकॉप्टरनं बंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी आठवडाभर अतिदक्षता विभागात असलेल्या नानजुंदी यांना चित्रपटसृष्टीतील कोणीही भेटायला आलं नाही; एवढंच नव्हे, तर त्यांच्या मृत्यूची अफवा ऐकून उधार पैसे घेतलेल्यांनी आनंद साजरा केला. त्यामुळं आठ वर्षांपूर्वी त्यांनी या व्यवसायाचा त्याग करून सराफा व्यवसायात प्रवेश केला. अशा कठीण प्रवासातून त्यांनी आज एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे. कोणत्याही अडचणीमुळं खचून जाता जोमानं प्रयत्न केले, तर यश हमखास मिळतंच हाच आदर्श नानजुंदी यांनी आपल्या जीवनातून घालून दिला आहे.

 


@@AUTHORINFO_V1@@