आई, लेकीची सगळ्यात जवळची मैत्रीण : अमृता फडणवीस देत आहेत मोलाचा संदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2018
Total Views |

 
 
मुंबई :  आज जागतिक मैत्री दिन म्हणजेच, फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अनेक लोक आपापल्या मित्र मात्रिणींसोबत फोटो, व्हिडियो पोस्ट करुन शुभेच्छा देत आहेत. मात्र राज्याच्या प्रथम महिला म्हणजेच अमृता फडणवीस यांनी या दिनाचे निमित्त साधून एक अमूल्य असा संदेश दिला आहे, तो म्हणजे आई आणि मुलगी हे नातं केवळ माय लेकीचं नातं नसून सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचं नातं आहे.
 
 
 
 
 
आजच्या दिनाच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी आपल्या लेकीसोबत म्हणजेच दिविजा देवेंद्र फडणवीस सोबत एक व्हिडियो पोस्ट केलेला आहे. यामध्ये लहानगी दिविजा आपल्या आईला आणि तिची आई तिला फ्रेंडशिप बॅण्ड्स बांधत आहे. यामुळे आई केवळ एक आईच नाही तर मैत्रिण देखील आहे, असा संदेश देण्यात आला आहे.
 
लहानगी दिविजा अत्यंत गोड दिसतेय. तर तिच्या गोड आवाजाच 'हॅप्पी फ्रेंडसिप डे' ऐकायला देखील छान वाटतं. खरं तर आपल्या संस्कृतीत मैत्रीसाठी एखादा दिवस राखीव नाही, मात्र तरी देखील या दिनाचा निमित्त साधून अमृता फडणवीस यांनी एक अत्यंत सकारात्मक संदेश दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@