उज्ज्वला योजनेचे घवघवीत यश; ८ महिने अगोदरच लक्ष्य पूर्ण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2018
Total Views |


 

 
नवी दिल्ली : एप्रिल २०१९ पर्यंत कोटी गॅस जोडण्या करण्याचे उद्दिष्ट असलेली मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना महिने अगोदरच पूर्ण झाली आहे. या योजनेच्या घवघवीत यशाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी, पाच करोड क्रमांकाच्या लाभार्थी ठरलेल्या दिल्ली येथील रहवासी तकदीरम यांना त्यांचे कनेक्शन सुपूर्द केले. यावेळी त्या बोलताना म्हणाल्या, "या योजनेचे महत्व तेच समजू शकतात, ज्यांनी आपल्या आईला चूल फुंकताना पाहिले आहे आणि धुराने डोळे चोळताना पाहिले आहे."
 
 
 
 

२०११ जनगणनेतून सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय निवडण्यात आलेल्या कोटी कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन पुरवणे उद्दिष्ट ठेऊन, मे २०१६ साली उत्तरप्रदेशमधील बालिया येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली होती. ही योजना सुरु झाल्यानंतर अवघ्या २७ महिन्यांतच लक्ष्य पूर्ण करत कोटी महिलांच्या आयुष्यात सरकारने आनंद फुलवला आहे.

@@AUTHORINFO_V1@@