राहुल जाधव पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2018
Total Views |



सर्वसामान्य रिक्षाचालक ते महापौर प्रेरणादायी प्रवास


पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव यांची निवड झाली आहे. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे विनोद नढे यांचा पराभव केला. जाधव यांना एकूण ११३ पैकी ८० मते मिळाली तर नढे यांना ३३ मतांवर समाधान मानावं लागलं. दुसरीकडे उपमहापौरपदी भाजपाचे सचिन चिंचवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनया तापकीर यांचा पराभव केला. चिंचवडे यांना ७९ मते मिळाली तर तापकीर यांना ३२ मते पडली. या निवडणूक प्रक्रियेत भाजपाचे व राष्ट्रवादीचे ३-३ नगरसेवक अनुपस्थित राहिले.

 

नितीन काळजे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्याने महापौरपदाची निवडणूक जाहीर झाली होती. म्हणूनच महापौर, उपमहापौर निवडीसाठी आज (शनिवारी) महापालिकेच्या विशेष सर्वसाधरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान या निवडी करण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या संचालक नयना गुंडे यांनी काम पहिले. दरम्यान, या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिली तर अपक्ष व मनसेने भाजपाला मतदान केले.

 

सामान्य रिक्षाचालक ते महापौर

 

भाजपचे राहुल जाधव यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. जाधव राजकारणात यायच्या अगोदर उदरनिर्वाहासाठी शेती करायचे व रिक्षा चालवायचे. सर्वसामान्य शेतकरी व रिक्षाचालक महापौरपदी बसल्याने सर्वसामान्य नागरिक आनंदोत्सव साजरा करत आहेत. तर आमच्या मुलाने आता सर्वसामान्यांची सेवा करावी, असे त्यांच्या आईवडिलांनी म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@