विविध कामांसाठी रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2018
Total Views |

 

 
मुंबई : मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर आणि पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुलुंड ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ पर्यंत ब्लॉक असेल. मेल-एक्स्प्रेससह जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. हार्बरवर पनवेल ते वाशीदरम्यान दोन्ही मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० पर्यंत सीएसएमटी-पनवेल/ बेलापूर/ वाशी-सीएसएमटी स्थानकांदरम्यान लोकल धावणार नाही. ट्रान्सहार्बर सकाळी १०.१२ ते दुपारी ४.२६ पर्यंत बंद असणार आहे. ठाणे-वाशी/नेरूळ तसेच सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. पश्चिम रेल्वेमार्गावरील सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान ब्लॉक काळात अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळविल्या जाणार आहे.


@@AUTHORINFO_V1@@