जिल्हानेते आ. प्रशांत ठाकूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2018
Total Views |


 

 
हे कर्तृत्वत्वान व्यक्तिमत्व दिवसेंदिवस अधिकच प्रगल्भ नेतृत्व म्हणून उदयास आले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही भागात संकट निर्माण झाल्यास त्या ठिकाणी सर्वप्रथम धावून जाणारे, आ. प्रशांत ठाकूर हेच आहेत.
 

सामाजिक बांधिलकीचा वसा अनेकांना जन्मत:च लाभत असतो. असाच वसा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून त्यांच्या दोन्ही मुलांना मिळाला आहे. लहान चिरंजीव परेश ठाकूर पनवेल महापालिकेच्या माध्यमातून जनसेवा करीत आहेत, तर मोठे चिरंजीव प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार असून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात जनहिताची कामे करण्यासाठी स्वत:ला वाहून घेतले आहेभाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी हा वसा आपल्या कर्तृत्वाने वृद्धिंगत केला आहे. सुरुवातीला नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आता आमदार, तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अशी त्यांची झंझावती आणि देदीप्यमान वाटचाल सुरू आहे. जनतेच्या प्रती आपले देणे लागते आणि ते आपण पूर्ण केलेच पाहिजे, या जाणिवेतून आ. प्रशांत ठाकूर कार्य करीत आहेत.

 

रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून विविध कामे करीत असताना त्यांनी समाजसेवेचा आनंद मिळवला आहे. शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. पनवेल, उरण तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी एक लाखांपेक्षा अधिक वह्यांची भेट तसेच इतर शैक्षणिक साहित्य, अर्थसाहाय्य करण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात, महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, खेळाडूंसाठी विविध स्पर्धा, बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे, प्रवाशांच्या सोयीसाठी चळवळ, स्थानिकांच्या हक्कांसाठी लढा, बाहेरून आलेल्यांना सर्वतोपरी मदत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी आरोग्य महाशिबिराचे आयोजन केले जाते. ही कामे आ. प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सहकार्याने होत असतात. या सर्व कार्यक्रमांचा लाभ परिसरातील हजारो गरजूंना होत असतो.

 

समाजात जनजागृती निर्माण करण्याबरोबरच धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी खारघर मॅरेथॉन, राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा आणि कलावंतांना व्यासपीठ निर्माण व्हावे, यासाठी मल्हार महोत्सवाचे आयोजन ही कामेदेखील आ. प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने होत असतात. असे हे कर्तृत्वत्वान व्यक्तिमत्व दिवसेंदिवस अधिकच प्रगल्भ नेतृत्व म्हणून उदयास आले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही भागात संकट निर्माण झाल्यास त्या ठिकाणी सर्वप्रथम धावून जाणारे, आ. प्रशांत ठाकूर हेच आहेत. महाडची दुर्घटना असो की, पोलादपूरनजीक झालेला भीषण अपघात; घटनास्थळी जाऊन मदतकार्याची पाहणी करणे, जखमींच्या उपचारांकडे लक्ष देणे, अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना दिलासा देणे अशाप्रकारची कामे आ. प्रशांत ठाकूर यांना करताना संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे. त्यामुळेच त्यांना जिल्ह्यातील जनतेनेच ‘जिल्हा नेते’ म्हणून सन्मान दिला आहेसत्ताधारी भाजपमधील जिल्ह्याचे एकमेव आमदार असलेले प्रशांत ठाकूर, हे विधिमंडळाच्या अधिवेशनात विविध जनहिताचे प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधत असतात. तारांकित, औचित्य आणि लक्षवेधी या माध्यमांतून केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील समस्या अधिवेशनात मांडून आ. प्रशांत ठाकूर आपल्या अभ्यासपूर्ण ज्ञानाचा उपयोग जनहितासाठी करीत आहेत. 

 
वाढदिवस म्हटला की, बडेजाव येतो. परंतु, आ. प्रशांत ठाकूर त्यास अपवाद आहेत. आपल्या वाढदिवशी भेटवस्तू अथवा पुष्पगुच्छ न स्वीकारता, त्याऐेवजी पुस्तक भेट देण्याची त्यांनी परंपरा सुरू केली होती. ही परंपरा थांबवत त्यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यासही भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. . प्रशांत ठाकूर ५ ऑगस्ट रोजी वयाच्या ४४व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. वयाने ते युवक असले, तरी त्यांच्या कामाची धडाडी, कर्तृत्व आणि नेतृत्व प्रगल्भ झाले आहे. त्यामुळेच त्यांना रायगड जिल्ह्याचे नेते म्हणून येथील जनतेत आदराचे स्थान आहे, अशा या झंझावती नेतृत्वास वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा!

- मदन बडगुजर

@@AUTHORINFO_V1@@