सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची विकासकामे मार्गी लागणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |


 
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील लोकप्रतिनिधींच्या प्रभागातील विकासकामांना महापालिकेच्या आर्थिक चणचणीमुळे कात्री बसली आहे. परिणामी, लोकप्रतिनिधींना प्रभागातील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. “या सगळ्याची जाणीव मला ही आहे,” असे म्हणत “येत्या आर्थिक वर्षात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या प्रभागातील कामे होणार. त्यासाठी मी प्रयत्नशील आहे फक्त तुम्ही मला साथ द्या,” असे आश्वासन स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना दिले. शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत डोंबिवली पूर्व प्रभाग क्रमांक (७६ ) व (७७ ) मधील अंतर्गत रस्ते, युटीडब्ल्यूच्या कामांच्या निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. तत्काळ या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
 
मात्र, या सारखीच इतर प्रभागातील कामे ही तातडीने मार्गी लावण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात आली. तसेच, ज्या कामाच्या फाईल अडवून ठेवण्यात आल्या आहेत त्यावर तातडीने काम करा, असेही सांगण्यात आले. यावेळी सभापतींनी सर्वपक्षीय सदस्यांना दिलासा देत, “यासाठी येत्या आर्थिक संकल्पात सुमारे १२७ कोटींची तरतूद करण्यात आली असून नुकतीच भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेत ही कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. ही भेट जरी भाजप शिष्टमंडळाने घेतली असली तरी ती सर्वपक्षीय सदस्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी होती,” असेही यावेळी दामले म्हणाले.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@