पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |

मुंबई : सातत्यने होते असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांच्या खिशाला आता पुन्हा एकदा सरकारने कात्री लावली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी प्रतिलिटर ८० रुपयांचा दर ओलांडलेला असतानाच आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ लागू करण्यात आली आहे. नव्या दरवाढीनुसार पेट्रोल प्रतिलिटर २१ पैसे तर डिझेल प्रतिलिटर ३० पैशांनी महाग झाले आहे. त्यामुळे महिन्याअखेर सामान्य नागरिकांवर पुन्हा एकदा इंधनदरवाढीचा बोजा पडला आहे.

आजपासूनच ही नवी दरवाढ लागू करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे सध्या मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८५.९३ रुपये झाले आहेत. तर डिझेलसाठी नागरिकांना प्रतिलिटर ७४.५४ रुपये मोजावे लागत आहे. दरम्यान पुण्यामध्ये तर नागरिकांना पेट्रोलसाठी ८६ रुपये प्रतिलिटर द्यावे लागत आहेत. याउलट दिल्लीमध्ये मात्र या दरवाढीनंतर देखील नागरिकांना पेट्रोलसाठी ७८.५२ रुपये तर डिझेलसाठी ७० रुपये द्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून यासंबंधी नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
@@AUTHORINFO_V1@@