कलम ३५ अ वरील सुनावणी आता पुढील वर्षी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |

१९ जानेवारीला होणार पुढील सुनावणी

राज्यातील पंचायत निवडणुकांमुळे घेतला निर्णय





नवी दिल्ली :
कलम ३५ अ संबंधीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली असून पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये यासंबंधीची पुढील सुनावणी घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये पंचायत निवडणुकांचे वातावरण असून या निवडणुका व्यवस्थितपणे पार पडाव्यात यासाठी म्हणून या निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षततेखाली खंडपीठासमोर आज याविषयीच्या सुनावणीला सुरुवात झाली होती. यावेळी न्यायमुर्तींनी राज्यातील सध्य परिस्थितीचा आणि आगामी निवडणुकांचा आढावा घेतला. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये राज्यामध्ये पंचायत निवडणुका होणार असून या निवडणुका व्यवस्थितपणे पार पडाव्यात म्हणून सध्या राज्यातील सर्व यंत्रणा काम करत असल्याची माहिती न्यायालयासमोर ठेवण्यात आली. यावर न्यायालयाने आपली बाजू मांडत राज्यातील पंचायत निवडणुका व्यवस्थितपणे पार पडल्यानंतरच याविषयी सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच पुढील वर्षीच्या १९ जानेवारीला याविषयी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने म्हटले.


काय आहे कलम ३५ अ ?

सन १९५४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींच्या अनुमतीनुसार काश्मीरसंबंधी कलम ३५ ची रचना करून त्याचा संविधानात समावेश करण्यात आला. या कलमानुसार जम्मू-काश्मीर वगळता देशातील इतर कोणत्याही राज्यातील नागरिकांना काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली. हे कलम बेकायदेशीर असून यामुळे काश्मीर भारताच्या इतर भागापासून दुरावला जाईल, असे मत अनेकांनी वेळोवेळी व्यक्त केले होते. परंतु याकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले.
@@AUTHORINFO_V1@@