विद्याविहार स्टेशन जवळ विटांनी भरलेला ट्रक उलटून चार जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |


मुंबई : विद्याविहार रेल्वेस्थानकाजवळील तिकीट खिडकीजवळ विटांनी भरलेला ट्रक दुपारी साडेबाराच्या दरम्यान उलटून चारजण जखमी झाले. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. जखमींना राजावाडी रुग्णालयांत उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली. जखमींमध्ये ) विष्णू बयकर,) सद्दाम हुसेन,) संदेश दवणे,) दिनेश गिरी यांचा समावेश आहे.

 

विद्याविहार रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या -जाणाऱ्या प्रवाशांची नियमित गर्दी असते. शिवाय जवळपास सोमय्या कालेज असल्याने या वेळेत विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात ये - जा असते. रेल्वे स्थानकाजवळ शौचालयाच्या काम सुरु आहे. त्यासाठी लागणाऱ्या विटांनी भरलेला हा ट्रक मागे पुढे वळवताना ट्रकच्या एका बाजूचे चाक जवळच्या मॅनहोलमध्ये घुसले. अवजड वाहन असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तिकीट खिडकीजवळच्या जिन्याच्या जवळ अरुंद रस्त्यावर हा विटांनी भरलेला ट्रक पलटी झाला. यावेळी अनेकांची धावपळ उडाली. यावेळी चारजण जखमी झाले. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात सामान ठेवल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रेल्वे प्रशासन इमारतीच्या दिशेने कलंडला. दरम्यान ट्रक पलटी झाल्याने त्यातील विटा इतर साहित्यांचा ढिगारा अरुंद रस्त्यावर आला. या ढिगाऱ्याखाली अजून काही अडकले असल्याच्या शक्यतेने परिसरात भीतीचे वातावरण होते. यावेळेत कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. मात्र अपघाताच्या ठिकाणी प्रवाशांची फारशी वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल, पोलिस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ मदतकार्य सुरू केले. ट्रक विटांचा ढिगारा हटवण्याचे काम उशिरा सुरु होते. दरम्यान रेल्वे स्थानकाकडे जिन्याकडून जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून प्रवाशांना स्कायवाक वरून एका मार्गाने गर्दीतून ये - जा करावी लागते आहे. रेल्वेच्या हद्दीत विकासाचे काम सुरू आहे. त्यासाठी सामान घेऊन ट्रक जात जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@