पवार यांना देशाला आत्मनिर्भर करणारा पक्ष नको

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |

ओबीसी मोर्चाच्या आढावा बैठकीत विजय चौधरी यांचे प्रतिपादन

 
नंदुरबार, ३१ ऑगस्ट
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भाजपा सत्तेतून पायउतार व्हावे, अशी आंतरराष्ट्रीय समूहाचीही इच्छा असल्याचे सांगितले आहे. याचाच अर्थ पवार यांना राष्ट्राला आत्मनिर्भर व बलशाली करणारा पक्ष सत्तेत नको आहे, म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारला चारही बाजूने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले.
 
 
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाची आढावा बैठक उस्मानाबाद शहरातील हॉटेल जत्रा येथे झाली, त्यावेळी चौधरी बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी होते. चौधरी पुढे म्हणाले की, चाणक्य म्हणतात की, देशाचा राजा प्रामाणिक असला की, सर्व चोर एकत्र येतात. हिच परस्थिती केंद्रात आणि राज्यात बघण्यास मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी व सदस्यांनी खंबीरपणे पक्षकार्य करावे, असे आवाहन त्यांनी पदाधिकार्‍यांना केले. यावेळी व्यासपीठावर स्मानाबाद शहर जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजपा ओबीसी मोर्चाचे महामंत्री व लातूर मनपाचे उपमहापौर देवीदास काळे, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश महामंत्री अजय भोळे, जिल्हाध्यक्ष डॉ. गोविंद कोकाटे, ज्येष्ठ नेते कोंडप्पा कोरे, दत्ता सोनटक्के आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली अर्पण करुन जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
 
 
यावेळी त्यांनी पदाधिकार्‍यांना सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपयर्र्त पोहोचविण्याची सूचना चौधरी यांनी कार्यकर्त्यांना केली.यावेळी मोठ्या संख्येन कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
 
अत्यंत कठीण परिस्थिती असताना केंद्र व राज्य सरकारने विकासाचे पर्व सुरू केले आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात भीतीचा गोळा उठत आहे. म्हणूनच सरकारच्या विरोधात कट कारस्थान केले जात आहे. त्यात सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाही सहभागी असल्याचा आरोप करीत सरकार जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाला बांधील आहे, म्हणून केंद्रातील भाजपा नेतृत्वातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकार पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@