पालकांनी मुलांवर अपेक्षेचं ओझं लादू नयेधरणगाव येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह पिंगळे यांचे प्रतिपादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |

 
 
पालकांनी मुलांवर अपेक्षेचं ओझं लादू नये
धरणगाव येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह पिंगळे यांचे प्रतिपादन
धरणगाव, ३१ ऑगस्ट
पालकांनी आपल्या अपेक्षा पाल्यांवर लादू नये. वडील डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकले नाही तर मुलाने व्हावे, ही अपेक्षा करणेच मुळामत चुकीची आहेे. मुलांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन त्यांचा कल ओळखून त्यांना फुलू द्यावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी केले.
 
 
येथील दी अर्बन को-ऑप लि.धरणगावतर्फे शहरातील शाळा व महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम येथील विक्रम वाचनालयाच्या कै.दामूअण्णा दाते सभागृहात झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा.पिंगळे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलभाई गुजराथी यांनी केले. बँकेचे व्हा.चेअरमन आधार चौधरी, प्रवीण कुडे, सुभाष पाटील, सुभदा उपासनी, प. रा. विद्यालयाचे बी.एन.चौधरी, बँकेचे प्रशांत येवले, अमित वानखेडे होते. परिचय प्रमोद गाढे यांनी करून दिला. आभार संचालक ऍड.राजेंद्र येवले यांनी मानले. यशस्वितेसाठी भूषण भोई, धीरज गुजराथी, पंकज भाटिया यांनी परिश्रम घेतले.
डिजिटल सेवेबाबत दिली माहिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भूषविलेले बँकेचे चेअरमन हेमलालशेठ भाटिया यांनी बँकेच्या डिजिटलायझेशन संदर्भात माहिती दिली. तसेच संस्थेची प्रगती व बँकेने ग्राहकसेवेत उपलब्ध करून दिलेल्या डिजिटल प्रॉडक्टची माहिती उपस्थितांना दिली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@