मुंब्रा बाह्यवळण १० सप्टेंबरला होणार खुला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |


 

ठाणे : महामुंबईच्या वाहतूककोंडीला कारणीभूत ठरणारा मुंब्रा बाह्यवळण अखेर दि. १० सप्टेंबरला खुला करण्यात येणार आहे, यासाठी वाहतूक विभागाकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. हा रस्ता सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी १० सप्टेंबरला खुला करण्यात येणार आहे. या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक सुरु झाल्यास जिल्ह्यात सुरू असलेली जीवघेणी वाहतूककोंडी आता कायमची सुटू शकते. यासंदर्भातील बैठक गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यात जिल्ह्यातील वाहतूककोंडी, रस्त्यातील खड्डे आणि मुंब्रा बाह्यवळण, मुंब्रा पूल दुरुस्ती यावर चर्चा झाली. दरम्यान, हा रस्ता वेळेत सुरू करावा, यासाठी आपण बांधकाम विभागाला तंबी दिल्याचे जिल्हाधिकार्यांमनी बैठकीदरम्यान सांगितले.
 

या पुलाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व प्रकारची खबरदारी घेऊन हे काम पूर्णत्वास आणले. याशिवाय, सर्व पालिका हद्दीतील व ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे पॉलिमरसारखे तंत्रज्ञान, रेडी मिक्ससारख्या पद्धतीने तातडीने बुजवले जात आहे. आगामी गणेशोत्सव व अन्य सणासुदीच्या कालावधीत दुर्दैवी घटना घडू नये, जीवघेणी दुखापत होऊ नये, यासाठी नवनिर्वाचित जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी वाहतुकीची कोंडी सोडवण्याला प्रथम प्राधान्य देऊन मुंब्रा बायपासचे काम व खड्डे भरण्याकरिता मार्गदर्शन केले. हे बाह्यवळण खुले झाल्यास भिवंडीतील गोदामांची वाहतूक नियंत्रणात येईल. तसेच, उरण, जेएनपीटी तसेच पालघरकडून येणारी वाहनेदेखील नियंत्रित होतील.

 

या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्ग असणार्याउ पूर्व द्रुतगती मार्गावरून पुढे नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने सोडली जात असल्याने गेल्या काही महिन्यांपासून महामुंबईत मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी जोरदार पावसामुळे रस्त्यावरील काही भाग खचल्यामुळे नवीन समस्या निर्माण झाली होती. या रस्त्यालगत बाह्यवळणवर काही घरे होती. मात्र, तात्पुरती निवासव्यवस्था करूनही ती कुटुंबे तिथून न गेल्याने दुरुस्तीला उशीर होत गेला. दरम्यान ऑगस्टच्या पहिल्या आठवडयानंतरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र ऑगस्टचा हा मुहूर्त टळून आता दि. १० सप्टेंबरला मुंब्रा बाह्यवळण मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@