कुसुंबे बु.पाझर तलावाचे जलपूजनअनुलोमच्या प्रेरणेतून ग्रामपंचायतीने लोकसहभागातून उपसला गाळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |

 

 
कुसुंबे बु.पाझर तलावाचे जलपूजन
अनुलोमच्या प्रेरणेतून ग्रामपंचायतीने लोकसहभागातून उपसला गाळ

रावेर, ३१ ऑगस्ट
अनुलोम या संस्थेच्या प्रेरणेतून कुसुंबे बु॥ ग्रामपंचायतीने लोकसहभागातून गाळमुक्त केलेल्या पाझर तलावाचे जलपूजन गुरुवारी उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.
 
 
त्यांच्यासोबत तहसीलदार, विजयकुमार ढगे आर. जी. राणे, वनाधिकारी, रामेश्वर जाधव, विनय कुलकर्णी अभियंता सिंचन विभाग, सलीम तडवी सरपंच, कुसुंबे बु॥ मनोज महाजन अनुलोम रावेर उपविभाग, जनसेवक तुषार महाजन, रावेर भाग जनसेवक दीपक नगरे, सचिव श्रीराम फाउंडेशन उपस्थित होते.
या तलावाची निर्मिती दुष्काळी परिस्थितीत झाली. मात्र, गेल्या ५ वर्षांपासून या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. ही बाब लक्षात घेत अनुलोम संस्थेच्या प्रेरणेतून व सरपंच सलीम तडवी व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नातून ग्रामस्तरीय सनियंत्रण समितीच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत मात्र संपूर्ण लोकसहभागातून २२ एप्रिल ते १६ मे या कालावधीत तलावातील ३००० घनमीटर गाळ उपसा करण्यात आला. परिसरातील १४ शेतकर्‍यांनी तो गाळ स्वखर्चाने आपल्या शेतात नेऊन टाकला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या कृषी उत्पन्नात चौपटीने वाढ होणार आहे. परिसरातील विहिरी, बोअरवेल यांच्याही पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.
 
 
गाळमुक्त तलावाचे विधिवत जलपूजन करण्यात आले. यावेळी अनुलोम वस्तीमित्र पवन महाजन, रुबीयाना तडवी, ग्रामसेविका किशोर पाटील, असलम तडवी, विलास वाणी, प्रवीण पंडित, अतुल महाजन, जितू पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@