मुरबाड मध्ये भाजपा ओ बी सी मोर्चा तर्फे संपर्क संवाद सभा संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |


 

 
मुरबाड : मुरबाड येथे शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या संपर्क व संवाद सभेला कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला त्यावेळीं .आमदार किसन कथोरे यांनी सभेला मार्गदर्शन केली.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी, मुरबाडचे आमदार किसन कथोरे, माजी आमदार दिगंबर विशे, भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे ओबीसी मोर्चाचे ठाणे विभाग अध्यक्ष हरिश्चंद्र भोईर, प्रदेश महासचिव प्रशांत पाटील, ठाणे जिल्हा अध्यक्ष महेंद्र पवार मुरबाड तालुका भाजप अध्यक्ष जयवंत सूर्यराव मुरबाडच्या नगराध्यक्ष शीतल तोंडलीकर, सरचिटणीस सुरेश बांगर , तालुका उपाध्यक्ष भास्कर शेट वडवले , किसन अनंत कथोरे नारायन गोंधळी, उपस्थित होते.
 

राष्ट्रीय ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधानांनी घेतला त्यामुळे ओबीसी समुदायाचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत तसेच ओबीसी साठी नॉन क्रिमिलेयर मर्यादा १० लाख रुपयां पर्यंत करण्यासाठी प्रयत्न चालू असून ही माहिती लोकांना देण्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा तर्फे कोकण दौरा आयोजित करण्यात आला असल्याचे भाजप ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओबीसी मोर्चाचे ठाणे जिल्हाध्यक्ष महेंद्र पवार, सुत्रसंचलन जयवंत कराळे यांनी तर आभार प्रदर्शन ठाणे जिल्हा भाजपचे चिटणीस नितीन मोहोपे यांनी केले

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@