ग्रीन अंब्रेला साजरी करणार अनोखी जन्माष्टमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |



मुंबई : श्री कृष्ण जयंतीच्या निमित्ताने ग्रीन अंब्रेला ही संस्था यावर्षी आगळी-वेगळी जन्माष्टमी साजरी करणार आहे. कृष्णाच्या जीवनाशी निगडित विविध वृक्षांची लागवड करून ही संस्था पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहे. उद्या म्हणजे दि. १ तारखेला सकाळी ८ वाजता विक्रोळीतून या मोहिमेला सुरुवात होणार असून त्यानंतर मुंबईतील विविध ठिकाणी ही वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात येणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

 

पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन अंब्रेला ही संस्था नेहमीच अग्रेसर असून दरवर्षी विविध नवनवीन उपक्रम राबवत असते. प्रत्येक सणाला त्यासंबंधित झाडांची लागवड करून तो सण साजरा केला जातो. त्याच धर्तीवर यावर्षी कृष्ण जन्माच्या दिवशी ही वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात येणार असल्याचेही संस्थेतर्फे सांगण्यात आले. यामध्ये कृष्णवड, कदंबवृक्ष, मुचकुंद, पारिजातक या झाडांचा समावेश असून कृष्णाच्या जीवनात या झाडांचे अनमोल स्थान होते. सध्या हे वृक्ष दुर्मिळ होत चालले आहेत. दरम्यान, या दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षांची आपण लागवड करून त्यांना नष्ट होण्यापासून वाचवण्याचे आवाहन 'ग्रीन अंब्रेला'या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

 

"जन्माष्टमीच्या दिवशी काहीतरी वेगळं केलं पाहिजे याचा आम्ही शोध घेत होतो. त्यातून ही संकल्पना बाहेर आली. पर्यावरण संरक्षण व्हावे आणि दुर्मिळ वृक्षांचं जतन व्हावं हा आमचा या मोहिमेमागील उद्देश आहे. हे काम कोणी एक संस्था पूर्ण करू शकत नाही. पर्यावरण संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याने प्रत्येकाने यासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे."

- विक्रम यंदे

अध्यक्ष, ग्रीन अंब्रेला

@@AUTHORINFO_V1@@