पारोळ्यात घराला आगसंसारोपयोगी वस्तू जळून खाक, १० लाखांचे नुकसान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |

 



पारोळ्यात घराला आग
संसारोपयोगी वस्तू जळून खाक, १० लाखांचे नुकसान
पारोळा, ३१ ऑगस्ट
येथील शिवाजी विभाग जवळील लहान कुंभारवाड्यात वास्तव्यास असलेले हुसेन खान रमजान खान पठाण यांच्या घराला गुरुवारी मध्यरात्री अचानक शॉर्ट-सर्किटने आग लागल्याची घटना घडली. यात घरातील धान्य, रोख रकमेसह संसारोपयोगी वस्तू जळून अंदाजे १० लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने पठाण यांचे कुटुंब बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.
 
हुसेन खान रमजान खान पठाण हे फळांचा व्यवसाय करतात. त्यांनी व्यवसायातले चार लाख रुपये घरी आणले होते. ही आग एवढी भीषण होती की, संपूर्ण घराचे छप्पर उडून भिंतीला तडे गेले. यावेळी घरातून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडत होते. यात व्यवसायाचे आणलेले चार लाख रुपये, घरातील साहित्य, धान्य, मौल्यवान वस्तू, व्यवसायासाठी आणलेले साहित्य तसेच संसारातील सर्व जीवन उपयोगी वस्तू जळून त्यांचा अक्षरश: कोळसा झाला. याची सूचना नगरसेवक कैलास चौधरी यांनी अग्निशमन दलाला दिली.
 
अग्निशमन दलाचे कर्मचारी त्यांच्या वाहनांसह घटनास्थळी पोहोचले व आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत चार लाख रुपये व सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते.
यावेळी पठाण यांचे कुटुंब उघड्यावर आले असून या कुटुंबीयांसाठी परिसरातील रहिवासी धावून आले होते. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@