सिडको च्या अध्यक्षपदी आ. प्रशांत ठाकूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |


 

 

 राज्य सरकारकडून महामंडळे, प्राधिकरणाच्या नियुक्त्या
 
 
 
मुंबई : गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या महामंडळे, मंडळे आणि प्राधिकरणांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांच्या नियुक्त्या राज्य सरकारने शुक्रवारी केल्या. या नियुक्त्यांनुसार भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष . प्रशांत ठाकूर यांची शहर औद्योगिक विकास महामंडळाच्या (सिडको) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, भाजप प्रवक्ते माजी आमदार मधु चव्हाण यांची मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये १० महामंडळे, मंडळे, प्राधिकरण एका आयोगातील पदाचा समावेश आहे.
 

महामंडळ/प्राधिकरण नियुक्त्या

 

प्रशांत ठाकूर - अध्यक्ष - शहर औद्योगिक विकास महामंडळ, उदय सामंत-अध्यक्ष- महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण, मधु चव्हाण-अध्यक्ष - मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळ, हाजी अरफात शेख- अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग, जगन्नाथ अभ्यंकर - उपाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग, बाळासाहेब पाटील - सभापती - कोकण गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ, हाजी एस. हैदर आझम - अध्यक्ष - मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, सदाशिव खाडे - अध्यक्ष - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, नरेंद्र पाटील-अध्यक्ष- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, संजय उर्फ संजोय मारुतीराव पवार - उपाध्यक्ष - अण्णासाहेब पाटील - आर्थिक विकास महामंडळ, आशिष जयस्वाल - अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, प्रकाश पाटील - अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नितीन बानगुडे-पाटील - उपाध्यक्ष - महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, जगदीश धोडी - उपाध्यक्ष - कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ज्योती ठाकरे - अध्यक्ष - महिला आर्थिक विकास महामंडळ, विनोद घोसाळकर - सभापती - मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ, विजय नाहटा - सभापती - मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, रघुनाथ कुचिक - अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ, संदीप जोशी - अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ, मो. तारिक कुरैशी - अध्यक्ष - नागपूर गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळ, राजा उर्फ सुधाकर सरवदे - अध्यक्ष - महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@