मॉडेल कॉलेज ते डोंबिवली बससेवा सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2018
Total Views |


भाजप नगरसेवकाचा विद्यार्थ्यांना दिलासा

 

डोंबिवली : स्टेशन परिसरापासून काही महाविद्यालया पर्यंतचे अंतर गाठण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना अधिकचे कष्ट न पडावे यासाठी भाजप नगरसेवक साई शेलार यांच्या पुढाकाराने बुधवारी खांबाळपाडा येथील मॉडेल महाविद्यालय ते डोंबिवली स्टेशन बस सेवा सुरु करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला .

 

स्वर्गीय माजी नगरसेवक शिवाजी शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी खंबाळपाडा ते डोंबिवली स्टेशनपर्यत बस सेवा सुरु करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, स्थानिक नगरसेवक साई शेलार,स्थायी समिती सभापती राहुल दामले, परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्केमाजी नगरसेविका शिल्पा शेलार,जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, डोंबिवली शहर अध्यक्ष संजीव बिरवाडकर, नगरसेवक मुकुंद पेंडणेकर, निलेश म्हात्रे, संदीप पुराणिक, विनोद काळण, रमाकांत पाटील, नितीन पाटील, काँग्रेसचे गंगाराम शेलार, यासह भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजू शेख, महिला शहर अध्यक्षा पूनम पाटील, वर्षा परमार, मॉडेल महाविद्यालयाचे चेअरमन प्रदीप नायर, दिलीप भंडारी आदी मान्यवर उपस्थिती होते. डोंबिवलीतून खंबाळपाडा येथे सकाळी ६.२०, ६.५०, १०.५०, दुपारी १२.००, सायंकाळी ५.२० आणि ५.३० वाजता परिवहन बस सुटणार आहे. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यासाठी सुरु केलेल्या बससेवा कायमस्वरूपी ठेवण्याचे काम विद्यार्थ्यांचे आहे. तर प्राचार्या अनुराधा काणे यांनी राज्यमंत्री चव्हाण आणि स्थानिक नगरसेवक साई शेलार यांचे आभार मनात ही बस सेवा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांनीच्या सुरक्षततेचा प्रश्न सुटला असल्याचे सांगितले. मंजुनाथ महाविद्यालयात नगरसेवक साई शेलार आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली क्राऊन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आयुर्वेदिक रोग निदान शिबिर भरविण्यात आले होते. या शिबिरात नाडी परीक्षण, बि.एम.आय. तपासणी, व्यायाम विषयी सल्ला, शरीर प्रकृती निदान, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, प्लस ओस्कीमीटर, इसीजी तपासणी करण्यात आल्याचे यावेळी अध्यक्ष परेश जोशी यांनी सांगितले

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@