हेप्टाथलॉनमध्ये भारताचे सुवर्णपदक 'स्वप्न' पूर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2018
Total Views |
 


जकार्ता : येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धे २०१८ मध्ये भारताच्या खात्यामध्ये आता आणखी एक सुवर्णपदक जमा झाले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हेप्टाथलॉन क्रीडा प्रकारात भारताच्या स्वप्ना बर्मन हिने सर्वाधिक गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले आहे. स्वप्नाच्या या कामगिरीमुळे भारताच्या खात्यात एकूण ११ सुवर्णपदके जमा झाली आहेत.


हेप्टाथलॉनच्या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये स्वप्नाने उत्तम कामगिरी करत चीनच्या वांग क्युन्गलिंग आणि जपानच्या यामास्की युकी या दोघीनाही मागे टाकले आहे. हाय जम्प, लॉंग जम्प, शॉट पुट, १०० मी, २०० आणि ८०० मी स्पर्धेमध्ये आपल्या चमकदार खेळीचे प्रदर्शन करत २१ वर्षीय स्वप्नाने एकूण ६ हजार २६ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. स्वप्नापाठोपाठ चीनची वांग आणि जपानच्या युकीला अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळाले आहे.




दरम्यान स्वप्नाच्या या कामगिरीनंतर भारताच्या खात्यामध्ये सध्या एकूण ५४ पदके जमा झाली आहेत. ज्यामध्ये ११ सुवर्ण, २० रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. या पदकांसह सध्या भारत पदकांच्या गुणतालिकेमध्ये ९ क्रमांकावर आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@