ऊर्जामंत्र्यांचा लोकलने प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2018
Total Views |


 

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सीएसटी ते मुलुंड दरम्यान लोकल प्रवास केला. रस्ते वाहतुकीमुळे लागणारा वेळ वाचवण्यासाठी आणि सर्वसामान्य प्रवाशांसोबत संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रवास केला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या कळवा येथे लो dispatch center ची पाहणी करण्यासाठी आणि आढावा बैठकीसाठी बावनकुळे यांना जायचं होते. मात्र गाडीने जायचे झाल्यास ३ तासांचा अवधी लागणार होता आणि लोकलने अवघा पाऊणतास. यामुळे त्यांनी लोकलने प्रवास करून वेळ वाचवण्याचा निर्णय घेतला.

 

ऊर्जामंत्र्यांनी या प्रवासादरम्यान, प्रवाशांशी वार्तालाप केला. तसेच प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, ऊर्जामंत्र्यांच्या या लोकल प्रवासाचे स्थानिक स्थरातून स्वागत करण्यात येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@