गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2018
Total Views |


 


मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला हलवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते बुधवारी गोव्यात परतणार असल्याचेही सांगितले जात होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे त्यांना अमेरिकेत हलवणायचा निर्णय घेण्यात आल्याचे गोवा राज्य विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांनी पणजी येथे सांगितले. दरम्यान, पर्रिकर यांनी स्वादुपिंडाशी संबंधित आजारपणामुळे यापूर्वीही अमेरिकेत तीन महिने उपचार घेतले होते.

 

अमेरिकेतूनच पाहणार गोव्याचे कामकाज

 

मनोरहर पर्रिकर हे उपचारासाठी पुढील ८ दिवस अमेरिकेत असतील. पर्रिकर भारतात नसल्याने गोव्याचे कामकाजाची धुरा कोणाकडे येणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. परंतु या सर्व चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. पर्रिकर अमेरिकेतून गोव्याचे कामकाज पाहतील तसेच महत्वाच्या निर्णयांना ते अमेरिकेतूनच परवानगी देतील अशी माहिती गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@