पुलंचे अष्टपैलू व्यक्तिमत्व उलगडणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2018
Total Views |



जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल

मुंबई:मराठी वाचक- श्रोत्यांच्या भावविश्वावर अधिराज्य गाजवणारे साहित्यिक पु. . देशपांडे यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाचे दर्शन निरनिराळ्यामाध्यमातून चाहत्यांसमोर उलगडण्यात येणार आहे. पु.लं.च्या जन्मशताब्दी वर्षाला दि. नोव्हेंबरपासून सुरूवात होणार असून यानिमित्तानेवर्षभर विविध सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. या महोत्सवाचीसुरुवात विलेपार्ल्यातून होणार असल्याचे ते म्हणाले.

 

मंगळवारी सह्याद्री अतिगृहात पु. . देशापांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त सांस्कृतिक महोत्सवासंदर्भातील बैठक आयोजितकरण्यात आली होती. यावेळी . पराग अळवणी, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारीसचिन कुर्वे, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक संजीव पालांडे आदी मान्यवर उपस्थित होते. पु. . देशपांडे, . दि. माडगुळकर आणिसुधीर फडके यांनी महाराष्ट्राला भरपूर काही दिले आहे. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेले काम नवीन पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी या तिन्ही महानव्यक्तींचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार असल्याचे तावडे म्हणाले. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन वर्षभर करण्यात येणारआहे. पु. . देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करताना त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व समाजातील प्रत्येक व्यक्तींना कळावे, यासाठीवेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करण्यात येईल. तसेच या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सवात वर्षभर विविध सांस्कृतिककार्यक्रम, चित्ररथ आदींचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

अनोखाभावयोग

मराठी भावविश्व समृद्ध करणार्या पु. . देशपांडे, . डी. माडगुळकर सुधीर फडके या तिघांचेही जन्मशताब्दी वर्ष एकत्र आले आहे. १९१९मध्ये या तीनही थोर व्यक्तीमत्वांचा जन्म झाला आणि त्यानंतर कित्येक दशके त्यांनी साहित्य, संगीत-नाटक-चित्रपटादी कला क्षेत्रात आपलेमौलिक योगदान दिले.

सुधीर फडके : 25 जुलै, १९१९

. दि. माडगुळकर : ऑक्टोबर, १९१९

पु. . देशपांडे : 8 नोव्हेंबर, १९१९

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@