कल्याणच्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2018
Total Views |


 

डोंबिवली : गेल्या काही महिन्यांपासून कल्याण शहरात वाहतूककोंडीने नागरिकांसह लोकप्रतिनिधीही हैराण झाले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी जोर धरत असताना . नरेंद्र पवार यांनी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा गंभीर प्रश्न मांडून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
 

येत्या काही दिवसांत उत्सवांचा काळ असल्याने आणि नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी . नरेंद्र पवार यांनी केली आहे. याबाबत रस्त्यांवरील खड्डे आणि त्यात कल्याण शहरातील पुलांचे प्रश्न याने अत्यंत गंभीर समस्या धारण केली आहे. यावर तोडगा निघावा यासाठी . नरेंद्र पवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत. वाहतुकीशी संबंधित सर्व विभागांची एक बैठक नुकतीच . नरेंद्र पवार यांनी बोलावली होती. त्या बैठकीत सर्व यंत्रणांनी तातडीने वाहतूक समस्येवर तोडगा काढण्याची सूचना आमदारांनी केली होती. मात्र त्यानंतरही प्रशासकीय यंत्रणा ढिम्म असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली आहे. दरम्यान यासंबंधी चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.त्यामुळे लवकरात लवकर वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल.

 

स्थानिक महापालिका प्रशासन उदासीन असून एमएमआरडीए प्रशासन कोणतीच ठोस भूमिका घेताना दिसून येत नाही. यामुळे रोजच्या वाहतूककोंडीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. यासाठी शहराला जोडणाऱ्या सगळ्याच पुलांचे ऑडिट करून आयुर्मान संपुष्टात आलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीसाठी ठोस भूमिका घेणार आहोत. तसेच याबाबत आपण विशेष निधी उपलब्ध करून या पुलांची कामे तात्काळ करुन घेणार आहोत. जेणेकरून नागरिकांना सणासुदीच्या काळात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागणार नाही.

नरेंद्र पवार, आमदार

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@